राज्यभरात 22 दिवसांत शरद पवार घेणार 50 सभा; सातारा जिल्ह्यात होणार ‘5’ सभा
Satara News Team
- Wed 17th Apr 2024 04:53 pm
- बातमी शेयर करा
सातारा : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रचाराचा भार आपल्या खांद्यावर घेतला आहे. पवार प्रचारासाठी मैदानात उतरणार असून ते राज्यभरात 22 दिवसांत 50 सभा घेणार आहेत. सभांच्या माध्यमातून पवार थेट जनतेत जाणार आहे. एकूण 50 सभांपैकी सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यात त्यांच्या तब्बल 5 सभा होणार आहे. या सभांच्या माध्यमातून पवारांची तोफ पुन्हा एकदा जिल्ह्यात धडाडणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरची ही पहिलीच लोकसभा निवडणूक शरद पवार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यासाठीच राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी 50 सभा घेण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. पवारांची दोन लोकसभा मतदार संघ महत्वाचे आहेत. त्यामध्ये अनेक सातारा आणि दुसरा बारामती होय. यातील बारामती लोकसभेची निवडणूक ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.
बारामतीमध्ये शरद पवार यांच्या सर्वाधिक 8 सभा होणार असून माढा लोकसभा मतदारसंघात 6 तर रावेर आणि साताऱ्यात 5 सभा होणार आहेत. १८ एप्रिलपासून बारामतीतून शरद पवारांच्या सभेला सुरुवात होणार आहे. ११ मेपर्यंत ते राज्यभरात मॅरेथॉन दौरा करणार आहेत. पवारांच्या दिवसाला ३ ते ४ सभा या होणार असून त्या रावेर, शिरूर, बीड, पुणे अहमदनगर, बारामती, माढा, सातारा, कोल्हापूर,औरंगाबाद येथे लोकसभामतदार संघात सभा होणार आहेत.
सातारा जिल्ह्यात या – या दिवशी, ठिकाणी होणार सभा
१) पहिली सभा वाईत : शरद पवार यांची सातारा जिल्ह्यात पहिली सभा ही दि. २४ एप्रिल रोजी सातारा लोकसभा अंतर्गत वाई येथे होणार आहे.
२) दुसरी सभा कोरेगावात : दि. २९ एप्रिल रोजी सातारा लोकसभा अंतर्गत कोरेगाव येथे शरद पवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत.
३) तिसरी सभा फलटण-पाटणला : दि. ३० एप्रिल रोजी एकाच दिवशी शरद पवार सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी सभा घेणार आहेत. त्यामध्ये एक फलटण आणि पाटण येथील समावेश आहे.
४) चौथी सभा कराडात : दि. ३ मे रोजी सातारा लोकसभा अंतर्गत कराड येथे शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे.
५) पाचवी सभा साताऱ्यात : शरद पवार यांचाही सातारा जिल्ह्यातील शेवटची पाचवी सभा ही दि. ४ मे रोजी सातारा लोकसभा अंतर्गत सातारा येथे जाहीर सभा होणार आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 17th Apr 2024 04:53 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 17th Apr 2024 04:53 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 17th Apr 2024 04:53 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 17th Apr 2024 04:53 pm
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 17th Apr 2024 04:53 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Wed 17th Apr 2024 04:53 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Wed 17th Apr 2024 04:53 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Wed 17th Apr 2024 04:53 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Wed 17th Apr 2024 04:53 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Wed 17th Apr 2024 04:53 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Wed 17th Apr 2024 04:53 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Wed 17th Apr 2024 04:53 pm












