फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
100 कोटी रुपयांच्या विकास कामांचा होणार श्री गणेशा.राजेंद्र बोन्द्रे
- Fri 6th Mar 2026 05:26 pm
- बातमी शेयर करा
फलटण, : ०६ मार्च 2026रोजी फलटण नगरपरिषदेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष सौ. प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले तसेच मुख्याधिकारी निखिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती
बैठकीस नगरसेवक सोमाशेठ जाधव, सुदाम (अप्पा) मांढरे, अशोकराव जाधव, राहुल निंबाळकर, अमित भोईटे, संदिप चोरमले, रोहित नागटिळे, सचिन अहिवळे, किरण जाधव तसेच नगरसेविका मंगलादेवी नाईक निंबाळकर, सुपर्णा सनी अहिवळे, रूपाली अमोल सस्ते, मिना काकडे, मोहिनी हेंद्रे, कुमारी सिद्धाली अनुप शहा आदी उपस्थित होते.
याशिवाय स्वराज सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अमोल सस्ते, सनी (भैय्या) मांढरे व श्रीवल्लभ हेंद्रे यांनीही उपस्थिती दर्शवली.
मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी नगरपरिषदेच्या सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा सादर केला.
१०० कोटींच्या विकासकामांना गती
यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, फलटण शहराचा विकासाबाबत दिलेले सर्व शब्द पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद, राज्य व केंद्र शासनाच्या निधीतून सुमारे १०० कोटी रुपयांची विकासकामे पूर्णत्वास नेण्यात येणार आहेत. यामध्ये नगरपरिषदेकडील २० कोटी आणि विविध योजनांतील ८० कोटींचा निधी समाविष्ट आहे.
उद्यान, रस्ते, नाट्यगृह, तारांगण, हॉस्पिटल यांसारखी अनेक विकासकामे मंजूर झाली असून ती लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. तसेच आमदार सचिन पाटील यांनी रस्त्यांसाठी १६ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहितीही देण्यात आली.

हद्दवाढ व ‘अ’ वर्ग नगरपरिषदेकडे वाटचाल
फरांदवाडी, ठाकुरकी, जाधववाडी आणि चौधरवाडी या गावांचा समावेश करून फलटण नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव असून, भविष्यात अ वर्ग नगरपरिषद बनवण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहर विकासासाठी महत्त्वाच्या योजना
* बैठकीत शहर विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय व प्रस्ताव मांडण्यात आले, त्यामध्ये –
* शहरातील प्रमुख चौकांत १० सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणे
* पालखी महामार्गावरील चौकांचे सुशोभीकरण
* पाण्याच्या पाईपलाईन साठी ८ कोटींचा अतिरिक्त निधी
* दलित वस्तीसाठी ८ ते ९ कोटींची विकासकामे
* दगडी पुलाजवळील नाल्यासाठी साडेतीन कोटींचा निधी
* फरांदवाडी परिसरात १७ एकरांवर भव्य क्रीडांगण उभारणे
* विमानतळ परिसरात हेलिपॅड, हॅंगिंग गार्डन व ॲमिनिटी पार्क
* शहरात उच्च दर्जाचे CCTV कॅमेरे व कंट्रोल रूम उभारणे
* नगरपालिका इमारतींवर सोलर प्रकल्प राबवून वीजबिल कमी करणे
* शहरात विविध ठिकाणी पार्किंग सुविधा उभारणे
* तसेच सुपर मार्केटची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी पार्किंग व आधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला.
निकृष्ट कामांवर कठोर कारवाई
कामे वेळेत न करणाऱ्या किंवा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. अशा ठेकेदारांची ठेव रक्कम जप्त करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आला.
(जिल्हा मुख्यालया सारखे फलटण शहर विकसित करण्याचा संकल्प)
फलटण जिल्हा होण्याच्या दृष्टीने शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प व्यक्त करत रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, “फलटण भविष्यात जिल्ह्याचे मुख्यालय होऊ शकते. त्या दृष्टीने शहराची पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे. नगरपरिषद निवडणुकीनंतर सत्तांतर झाले असून फलटण शहरात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत पायाभूत सोयी सुविधांच्यावर भर देऊन, अत्यावश्यक विकासकामे पूर्णत्वास नेऊन फलटण शहराची नव्याने ओळख निर्माण होताना भविष्यात दिसून येणार आहे. विकासाची गती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या दूरदृष्टीने कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.
भविष्यात लवकरच शहरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या सुखसोई उपलब्ध होणार असे चित्र या आढावा बैठकीच्या माध्यमातून प्रत्यक्ष दर्शनी दिसून येत आहे.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 6th Mar 2026 05:26 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 6th Mar 2026 05:26 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 6th Mar 2026 05:26 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 6th Mar 2026 05:26 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Fri 6th Mar 2026 05:26 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Fri 6th Mar 2026 05:26 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 6th Mar 2026 05:26 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Fri 6th Mar 2026 05:26 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Fri 6th Mar 2026 05:26 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Fri 6th Mar 2026 05:26 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Fri 6th Mar 2026 05:26 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Fri 6th Mar 2026 05:26 pm












