पाडेगांव ता. फलटण येथील युवकाचा गळा चिरुन खुन केलेल्या मारेक-याना लोणंद पोलीसांनी केले जेरबंद
Satara News Team
- Tue 9th Aug 2022 12:00 pm
- बातमी शेयर करा
गेले तीन महिन्यापासुन गुन्हयातील आरोपी हे पोलीसांना गुंगारा देत होते. आरोपीचे दहशतीमुळे गावातील तसेच परिसरातील कोणीही माहिती देण्यास तयार होत नव्हते. आरोपीची संपुर्ण माहिती लोणंद पोलीस स्टेशनचे पोहवा अविनाश नलवडे, पोका विठ्ठल काळे, पोना कदम यांनी खब-या मार्फत माहिती प्राप्त करुन सहा. पोलीस निरीक्षक वायकर यांना दिली. त्यानंतर विशाल वायकर व सहका-यांनी सदर माहितीचे आधारे व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे तपासाची वेगाने सुत्रे हालवुन वरील आरोपींना ताब्यात घेतले
सातारा : दि. 10.5.2022 रोजीचे सकाळी 06.30 वाजण्याचे पुर्वी मौजे पाडेगाव ता. फलटण गावचे हद्दीत शिवचा मळा येथे फिर्यादीचे रहाते घरासमोर उघड्यावर अंगणात फिर्यादी निळकंठ उर्फ गणेश नारायण मोहिते यांचा लहान भाऊ राहुल नारायण मोहिते वय 31 वर्षे, रा. पाडेगाव शिवचामळा ता. फलटण हा घराबाहेरील लोखंडी कॉटवर झोपला असताना कोणीतरी अज्ञात इसमांनी कोणत्यातरी कारणावरून गळ्यावर धारधार शस्त्राने वार करुन खून केला होता त्याबाबत लोणंद पोलीस ठाणेस खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गेले तीन महिन्यापासुन उघडकिस न आलेल्या अत्यंत गुंतागुंतीचे खुनाचे गुन्हा उघडकिस आणणे हे पोलीसांचे समोर मोठे आव्हान होवुन बसले होते. या खुनाचे गुन्हयाकडे सातारा जिल्हयातील सर्वांचे लक्ष लागून होते. सदर झालेल्या खुनाचे घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. अजयकुमार बंसल, तसेच अपर पोलीस अधीक्षक, श्री. अजित बो-हाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री तानाजी बरडे यांनी तपासाबाबत वेळोवेळी घटनास्थळी व पोलीस स्टेशनला भेट देवुन योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केले होते. गुन्हयाचा तपास चालू असताना सहायक पोलीस निरीक्षक श्री विशाल के. वायकर, व त्याचे सहका-यांनी मिळाले गोपनिय माहिती व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे आरोपींची कठोर परिश्रमानंतर नावे निष्पन्न करुन गुन्हयाचे तपासकामी चार आरोपी व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांचा सहभाग निष्पन्न करुन खुनाचा गुन्हा उघडकिस आणला आहे.

गेले तीन महिन्यापासुन गुन्हयातील आरोपी हे पोलीसांना गुंगारा देत होते. आरोपीचे दहशतीमुळे गावातील तसेच परिसरातील कोणीही माहिती देण्यास तयार होत नव्हते. आरोपीची संपुर्ण माहिती लोणंद पोलीस स्टेशनचे पोहवा अविनाश नलवडे, पोका विठ्ठल काळे, पोना कदम यांनी खब-या मार्फत माहिती प्राप्त करुन सहा. पोलीस निरीक्षक वायकर यांना दिली. त्यानंतर विशाल वायकर व सहका-यांनी सदर माहितीचे आधारे व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे तपासाची वेगाने सुत्रे हालवुन वरील आरोपींना ताब्यात घेतले. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण श्री. तानाजी बरडे यांनी आरोपीना कौशल्यरित्या विचारपुस करुन गुन्हयाचा तपशीलवार घटनाक्रम उघडकिस आणला असुन आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीची पोलीस कोठडी घेवुन गुन्हा कोणत्या कारणासाठी, कोणत्या हत्याराने केला याबाबत तपास करण्यात येणार आहे.

श्री. अजयकुमार बन्सल, पोलीस अधिक्षक सातारा, श्री अजित बो-हाडे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. विशाल के, वायकर, सहायक पोलीस निरीक्षक, श्री. गणेश जी. माने, पोलीस उपनिरीक्षक, स्वाती पवार, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार महेश सपकाळ, विठ्ठल काळे, अविनाश नलवडे, अतुल कुंभार, संतोष नाळे, श्रीनाथ कदम, सर्जेराव सुळ, अमोल पवार, अवधुत धुमाळ, अभिजीत धनवट, फैयाज शेख, केतन लाळगे, अविनाश शिंदे, बापुराव मदने, गोविंद आंधळे, चालक विजय शिंदे, अमोल अडसुळ, महिला अंमलदार शुंभागी धायगुडे, प्रिया नरुटे, यांनी सदरची कारवाईत सहभाग घेतला आहे. लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. विशाल के वायकर व त्यांचे सहका-याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 9th Aug 2022 12:00 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 9th Aug 2022 12:00 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 9th Aug 2022 12:00 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 9th Aug 2022 12:00 pm
संबंधित बातम्या
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Tue 9th Aug 2022 12:00 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 9th Aug 2022 12:00 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Tue 9th Aug 2022 12:00 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Tue 9th Aug 2022 12:00 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Tue 9th Aug 2022 12:00 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Tue 9th Aug 2022 12:00 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Tue 9th Aug 2022 12:00 pm












