दहिवडी पोलीसांची मार्डी येथील गांजा शेतात धडाकेबाज कारवाई...

सुमारे ०९ लाख ९ हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत.

 दहिवडी पोलीस ठाण्याची नवनियुक्त सपोनी. अक्षय सोनवणे यांनी पहिल्याच बाॅलवर षटकार मारत  दोन नंबर वाल्यांच्या विरोधात धमाकेदार कारवाई करत आपले मनसुबे  स्पष्ट केले आहेत. त्यामुळे दोन नंबर व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 
      माण मधील मार्डी येथे पोलीसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने मके सारख्या पिकांत गांजा लागवड करून त्याची विक्री करत असल्याची माहिती दहिवडी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे दहिवडी पोलिसांनी वेशांतर करून गुडघाभर चिखलात घुसून सदर शेतात छापा टाकला. 
सदर छाप्यात दहिवडी पोलीस ठाण्याचे इतिहासातील आज पर्यंतची गांजा विक्री विरोधातील सर्वात मोठी कारवाई करत राहुल तुकाराम गायकवाड वय 23 वर्ष यांच्यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीस अटक केली आहे. सदर कारवाईत सपोनि अक्षय सोनवणे यांनी सुमारे नऊ लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.    
     सदर घटनेची सविस्तर कारवाई उपविभागीय अधिकारी गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनी अक्षय सोनवणे संजय केंगले, प्रकाश हांगे, नीलम रासकर आदि पोलिसांनी कारवाई केली. यावेळी सरकारी पंच म्हणून नायब तसिलदार इतर, मंडल अधिकारी खेडेकर, तलाठी योगेश अभंग, इ. काम पाहिले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला