'चहा प्यायल्याने' दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू, नियमित दुधाचा चहा मुलांसाठी सुरक्षित आहे का?

सातारा न्यूज : 
बहुतांश लोकांची सुरुवात चहाने होते, त्यामुळे चहा हा लागतोच. शरीराला ताजे आणि टवटवीत करणारा हा चहा लहान मुलांसाठी योग्य आहे का? हा प्रश्न पुन्हा एकदा चवाट्यावर आला आहे, कारण मध्य प्रदेशातील देवास येथील 18 महिन्याच्या बाळाचा चहा प्यायल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
चहा प्यायल्यानंतर दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाल्याची ही एक दुर्दैवी घटना आहे. मुलं मोठ्यांच्या सवयी आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतात. घरातील मोठ्यांच्या सवयी ती निवडतात. सकाळी उठल्यावर चहा पिणे हे त्यापैकी एक सवय! सकाळी चहा पिणे ही वाईट सवय जरी नसली तरी, लहान मुलांसाठी चहा विशापेक्षा कमी नाही. बहुधा अनेक मुलं किचन सेटमध्ये लहान चहाच्या सेटसह खेळतात, शिवाय भातुकलीच्या खेळात चहाचा सेट हा असतोच, ज्यामुळे लहान वयातच मुलांना तुम्ही चहाची ओळख करून देतात. त्यामुळे लहान मुलांना देखील चहा पिण्याची इच्छा होऊ शकते.
बर्‍याच कुटुंबांमध्ये, लहान मुलांना चहा मागितला तर दिला जातो. मध्य प्रदेशातील देवास येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत दीड वर्षाच्या मुलाचा चहा प्यायल्याने मृत्यू झाला. अहवालानुसार, मूल त्याच्या आजी-आजोबांसोबत खेळत होते, दरम्यान चहा प्यायल्यानंतर लगेचच त्याचा श्वास थांबला. असे का झाले याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
चहाच्या पानांमध्ये कॅफीन असते, जे मेंदू आणि मज्जासंस्थेला उत्तेजित करते, त्यामुळेच चहा प्यायल्याने तरतरी येते. मोठ्या माणसांसाठी चहा शरीराला ऊर्जा देणारे पेय आहे, मात्रा 12 वर्षाखालील मुलांसाठी चहा (कॅफीन) पिण्याच्या कोणत्याही शिफारसी तज्ञ करीत नाही. कॅफिनचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत परंतु या काही खालील कारणांमुळे 12 वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी चहा सुरक्षित मानला जात नाही.
कॅफिनचे सेवन थेट मेंदूच्या क्रियाकलाप आणि मज्जासंस्थेला उत्तेजित करते ज्यामुळे मुलाच्या झोपेच्या दिनचर्येवर परिणाम होतो आणि परिणामी सकाळी थकवा येतो.
कॅफिनचे दररोज सेवन केल्याने एखाद्याला त्याचे व्यसन होते.
कॅफिन एक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून देखील कार्य करते ज्याचा अर्थ मूत्र उत्पादनात वाढ होते.
काही लहान मुलांना साध्या दुधाची चव आवडत नाही. अशावेळी त्यांना चहा देण्याऐवजी दुधामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स टाकून त्यांना द्यायला हवे. जेणेकरून ते चहा मागणार नाही.
मध्य प्रदेशात घडलेल्या घटनेचा संदर्भ देताना तज्ञ म्हणतात, “चहा प्यायल्यामुळे मुलाचा मृत्यू झाला हे स्पष्ट सांगता जरी येत नसले तरी, लहान मुलांमध्ये चोकिंग किंवा गुदमरण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे कोणतेही द्रवपदार्थ, किंवा अन्न अयोग्यरित्या गिळणे होय".

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला