मुख्यमंत्र्यांच्या गावाकडे जाणाऱ्या मजूरांच्या टेम्पोस अपघात

ब्रेक फेल झाल्याने टेम्पो दरीत कोसळला; ४० जण जखमी

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील मुकदेव गावानजीक बुरडाणी घाटात तिव्र उतारावर मजुरांना घेऊन जाणारा 407 टेम्पोला अपघात झाला आहे. टेम्पोमध्ये एकूण 40 लोक असल्याची माहिती मिळत असून जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे, काही जखमींना तळदेव येथे तर काहींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून दोन गंभीर जखमी लहान मुलांना सातारा येथे पाठविण्यात येणार आहे, सह्याद्री ट्रेकर्सचे जवान संजय पार्टे, दिपक जाधव, गायकवाड व ग्रामस्थ मदत कार्यात सक्रीय होते. 


          अधिक माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळगाव असलेल्या दरे तांब तालूका महाबळेश्वर या ठिकाणी काम करण्यासाठी पुणे चाकण येथून 40 प्रवासी प्रवास करत होते. रस्त्याच्या कामासाठी जाणारे एकूण 40 प्रवासी होते. सकाळी 7:00 वाजता प्रवास चालू होता. प्रवासादरम्यान बुरडाणी घाटामध्ये गाडीचे ड्रायव्हर प्रदीप खंडू कुरदने (वय 23) हे गाडी चालवत होते. गाडीचा ब्रेक फेल झाल्यामुळे ड्रायव्हरने प्रसंगावधान साधून गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी 300 फूट खोल दरीत कोसळली. याच घाटामधून तळदेव येथील स्थानिक लोक प्रवास करत असताना त्यांना ही बाब लक्षात आली त्यांनी त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव येथे माहिती दिली प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव व तापोळा यांच्या तीन रुग्णवाहिका व स्टाफ घटनास्थळी दाखल झाल्या तसेच स्थानिक लोकांच्या खाजगी वाहनातून जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव येथे घेऊन आले यामध्ये लहान मुले 11, महिला 10, पुरुष 8 या लोकांची प्रकृती स्थिर असल्याकारणाने या लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव येथे ठेवण्यात आलेले आहे तसेच ज्या लोकांचे प्रकृती जखमीची व अति जखमेची आहे अशा लोकांना प्राथमिक उपचार देऊन ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे दाखल करण्यात आलेले आहे यामध्ये एकूण 11 लोकांना रेफर करण्यात आले यामध्ये गर्भवती माता 2 आहेत. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

 

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला