घरफोडीच्या गुद्यामधील आरोपीच्या ५ तासाचे आत औंध पोलीसांनी मुसक्या आवळल्या.
आशपाक बागवान.
- Tue 7th Mar 2023 08:54 pm
- बातमी शेयर करा
औंध : औंध पोलीस ठाणे हद्दीत मौजे वेळीव वा बटाव जि.सातारा गावी पाण्याचा मळा नाव शिवारात सौ. मनिषा हणमंत जानकर यांचे राहते घरात दिनांक ०२/०३/२०२३ रोजी सकाळी १०.०० ते ०६.०० या सुमारास घडला असून यातील फिर्यादी व तिची मुलगी कु.स्नेहल असे दोषी सकाळी १०.०० वा. सुमारास शेतात काम करण्यासाठी गेले व सायंकाळी ०६.०० वा.चे सुमारास शेतातील काम संपवून घरी आले. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले त्यावेळी फिर्यादी हिने घरात जावून पाहिले असता तिने लोखडी कपाटामध्ये ठेवलेल्या कपाटाचे कपडे दिसले. तसेच शेजारी सामान अस्ताव्यस्थ पडलेले दिसले. म्हणून तिने या चेक केला असता त्यामध्ये तिने ठेवलेले एक जोडी सोन्याचे कानातील टॉप्स व वेल डब्यामध्ये दिसले नाही. यावरून खात्री झाली की, घरात कोणीतरी अज्ञात चोरट्याने ४५,६३८ रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे. म्हणून वगैरे मजकुरची खबरी वरून औंध पोलीस ठाणे गु.र.नं. ८०/२०२३ मा वि. सं. कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असून घटनास्थळा जवळील उस तोड टोळया गोपनिय माहिती काढून सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी नामे घोडीराम महादेव शिंगाडे वय ४० वर्षे शिस्ताव ता.माण जि.सातारा याचा अवघ्या ५ तासात शोध घेवून त्यास गुन्याचे कामी अटक करून यातील फिर्यादीचा ४५,६३८/- रुपये किंमतीचा सोन्याचे दागिण्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच सदर संशयीत आरोपी याने औध पोलीस ठाणे गुरनं. २४/२०२३ भादंविसं ४५४, ४५७,३८० हा गुन्हा केल्याबाबत कबुली दिली आहे. दोन्ही गुन्हयातील १०० टक्के मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचे तपासाबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस ठाणेचे प्रभारी स.पो.नि. दराडे व त्यांचे सहका-यांनी सदर पडलेल्या गुन्ह्याबाबत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न करून सदर आरोपीस ५ तासाचे आत अटक करून आरोपीकडून चोरीस गलेला माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास मा.पोलीस अधीक्षक सो, सातारा श्री. समीर शेख, मा.अपर पोलीस अधीक्षक, सो, श्री. बापू बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग कॅम्प वडूज श्री. निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली औंध पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय पी. दराडे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे. पोहवा.प्रशांत पी.पाटील बनं. ५८१, पोना. संतोष एम. पाडळे बनं.२३५४ पोहचा. आर. पी. कांबळे १६५९ गृहरक्षक धिरज धनाजी नलवडे सनद नं.८.३३८, गृहरक्षक सुधीर बापू मदने सनद नं.८३४९ यांनी सदस्या गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री.समीर शेख पोलीस अधिक्षक सो. सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 7th Mar 2023 08:54 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 7th Mar 2023 08:54 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 7th Mar 2023 08:54 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 7th Mar 2023 08:54 pm
संबंधित बातम्या
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Tue 7th Mar 2023 08:54 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 7th Mar 2023 08:54 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Tue 7th Mar 2023 08:54 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Tue 7th Mar 2023 08:54 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Tue 7th Mar 2023 08:54 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Tue 7th Mar 2023 08:54 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Tue 7th Mar 2023 08:54 pm












