माऊली हॉस्पिटलमध्ये मूळव्याध, व्हेरिकोज व्हेन्सबाबत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन 

सातारा : देगाव फाटा, एमआयडीसी समर्थनगर, सातारा येथील प्रसिद्ध असलेल्या माऊली हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे गुरुवार दि. २१ जुलै २०२२ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत मूळव्याध व्हेरिकेज व्हेन्स (पायामधील रक्त वाहिन्या) बाबत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केल्याची माहिती सर्जन डॉ.एकनाथ जाधव व डॉ.गौरी जाधव यांनी दिली आहे.


 मोफत मूळव्याध व व्हेरिकेज व्हेन्स (पायामधील रक्त वाहिन्या) बाबत आरोग्य तपासणी शिबिरात गरजू रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच औषध उपचाराबाबतही माहिती देऊन रुग्णांना सल्ला दिला जाणार आहे. या शिबिरात गरजू रुग्णांचे सवलतीच्या दरात अत्याधुनिक इस्त्राईल तंत्रज्ञान वापरून लेझर मशीनद्वारे उपचार करण्यात येतील. सातारा जिल्ह्यात एकमेव माऊली हॉस्पिटल हे प्रथमच लेझर मशीनद्वारे मूळव्याध, व्हेरिकोज व्हेन्स रुग्णांना खऱ्या अर्थाने संजीवनी ठरणार आहेत. या शिबिरामध्ये भाग घेण्यासाठी गरजू रुग्णांनी फोन नं. - ०२१६२-२४४४२३ व मोबा नं - ९०६७७०१६१७ व ९५७९२४९६७५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन माऊली हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला