प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने जेवणाचा डब्बाच डोक्यात मारून तरुणाचा खुन
Satara News Team
- Wed 21st May 2025 08:36 am
- बातमी शेयर करा

शिरवळ :शिरवळ मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून परप्रांतीय तरुणावर जेवणाच्या डब्याने हल्ला करून. कालव्यात ढकलून देत खून करण्यात आला.
ही घटना शिरवळ येथील दत्तनगर येथील निर्मनुष्य असलेल्या नीरा-देवघर कॅनॉलजवळील पायवाटेवर सोमवारी (१९ मे) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. शिरवळ पोलिसांनी अवघ्या एक तासामध्ये पर्दाफाश करीत संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या.
प्रदीप रामाश्रय सिंग (वय ३१, सध्या रा. दत्तनगर, शिरवळ, मूळ रा. जिगरसंडी, ता. जहानागंज, जि. आजमगढ, उत्तर प्रदेश), असे खून झालेल्या तरुणाचे, तर जितेंद्रकुमार राजमन गौतम (२०, सध्या रा. दत्तनगर, शिरवळ, मूळ रा. दुर्गोलीकला, बदलापूर, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती नुसार प्रदीप सिंग व जितेंद्रकुमार गौतम हे दोघे एकत्र राहत होते. सोमवारी काम संपल्यानंतर दोघांनी दारू प्यायले. त्यानंतर दोघेही साडेनऊच्या सुमारास घरी निघाले. नीरा-देवघर कॅनॉलजवळील पायवाटेवरून जात असताना जितेंद्रकुमार गौतम याने प्रदीप सिंग याच्याबरोबर प्रेमसंबंधावरून वाद घातला. प्रेमसंबंधास तो अडथळा ठरत असल्याच्या रागातून प्रदीप सिंग याच्या डोक्यात त्याने स्टीलच्या डब्याने मारहाण केली. त्यानंतर नीरा-देवघर कॅनॉलमध्ये त्याला ढकलून दिले. त्याची हालचाल बंद होईपर्यंत जितेंद्रकुमार हा घटनास्थळी १५ ते २० मिनिटे थांबून होता. तो मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याने दोघांचे मोबाइल काही अंतरावर फोडले.
तेथून काही अंतरावर राहत असलेल्या नातेवाइकांजवळ तो गेला. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी लुटले. मी पळून आल्याचे त्याने नातेवाइकांना सांगितले. या घटनेची माहिती मिळताच फलटणचे पोलिस उपविभागीय अधिकारी राहुल धस, शिरवळचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील शेळके, सहायक पोलिस निरीक्षक महादेव सीद तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला.
शिरवळ पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला. मृत प्रदीप सिंग याच्याबद्दल माहिती घेत असताना जितेंद्रकुमार गौतम याच्या बोलण्यात विसंगती व परिस्थितीवरून काही तरी वेगळे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यामुळे संशय अधिकच बळावला. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली. खुनाचा उलगडा होताच शिरवळ पोलिसांनी जितेंद्रकुमार याला अटक केली.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Wed 21st May 2025 08:36 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Wed 21st May 2025 08:36 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Wed 21st May 2025 08:36 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Wed 21st May 2025 08:36 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Wed 21st May 2025 08:36 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Wed 21st May 2025 08:36 am
संबंधित बातम्या
-
वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.
- Wed 21st May 2025 08:36 am
-
गुरु द्रोणा अकॅडमी फलटण येथे विद्यार्थ्यास मारहाण.
- Wed 21st May 2025 08:36 am
-
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Wed 21st May 2025 08:36 am
-
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Wed 21st May 2025 08:36 am
-
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Wed 21st May 2025 08:36 am
-
वरकुटे-मलवडीत जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांचा छापा; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- Wed 21st May 2025 08:36 am
-
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Wed 21st May 2025 08:36 am
-
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Wed 21st May 2025 08:36 am