आ. शशिकांत शिंदे आणि आ. महेश शिंदे यांनी एकाच वेळी आंदोलनस्थळी दाखल झाल्याने काही काळ तणाव
Satara News Team
- Fri 23rd Dec 2022 04:09 pm
- बातमी शेयर करा
साताऱ्यात एकच चर्चा नक्की भंगार चोर कोण? याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीचे समर्थक रमेश उबाळे हे मेडिकल काॅलेजच्या जवळपास 1 कोटी रूपयांचा भंगार चोर कोण यांचा शोध घ्यावा, यासाठी आमरण उपोषणास बसले आहेत. याठिकाणी विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार महेश शिंदे यांनी एकाच वेळी आंदोलनस्थळी दाखल झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाले होते.कोरेगाव तालुक्यातील या दोन्ही राजकीय नेत्याच्यात सध्या एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सुरु आहे. कालच पत्रकार परिषदेत आ. शशिकांत शिंदे यांनी आ. महेश शिंदे यांच्यावर टिका करत दरोडा टाकणारी लोकं असं म्हटलं होतं. तर काही दिवसापुर्वी महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे भ्रष्टाचारी आहेत, असा आरोप केला होता. मात्र, साता-यातील नवं मेडीकल काॅलेज बांधकाम करण्यासाठी त्या जागेवर असलेल्या जुन्या इमारती पाडण्याचं काम सुरु आहे. मात्र, या कामातलं भंगार चोरल्याचा आरोप आमदार महेश शिंदे यांच्यावर करण्यात येत आहे. या प्रकारणी राष्ट्रवादी आ. शशिकांत शिंदे यांचा कार्यकर्ता रमेश उबाळे आंदोलनाला बसला आहे. या ठिकाणी शशिकांत सुद्धा आज उपस्थित होते. यावेळी अचानक विरोधी पार्टीचे आमदार महेश शिंदे यांची या ठिकाणी एँण्ट्री झाली.
कृष्णानगर येथील आंदोलन स्थळावरून आ. शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांच्या समोरच थेट जिल्हाधिकारी यांना फोन फिरवत दोषींवर कारवाईची मागणी त्यांच्याकडं केली केली आहे. तर महेश शिंदे यांनी स्वत:कडे असलेली कागदपत्र दाखवत स्वत:ची बाजू कशी भक्कम आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही आमदार समोरासमोर आल्यामुळं याठिकाणी थोडा काळ तणाव निर्माण झाला होता. भंगार चोरी वरुन एकाच आंदोलनात दोन्ही आमदार मांडी घालून बसलेल्याने सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 23rd Dec 2022 04:09 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 23rd Dec 2022 04:09 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 23rd Dec 2022 04:09 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 23rd Dec 2022 04:09 pm
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 23rd Dec 2022 04:09 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Fri 23rd Dec 2022 04:09 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Fri 23rd Dec 2022 04:09 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Fri 23rd Dec 2022 04:09 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Fri 23rd Dec 2022 04:09 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Fri 23rd Dec 2022 04:09 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 23rd Dec 2022 04:09 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 23rd Dec 2022 04:09 pm












