दुचाकी चोरट्यास वाई पोलिसांनी सापळा रचून केले जेरबंद

वाई : दुचाकी चोर वाई एमआयडीसी येथील सुप्रीम बिअर बारच्या परिसरात येणार असल्याचे खास खबऱ्याकडून माहिती वाई पोलिसांना मिळाली होती. वाई पोलिसांनी दि.17 रोजी दुपारी 12.30 वाजता सापळा रचून त्या चोरट्यास जेरबंद केले. आदेश लालसिंग धनावडे(रा.आंबेदरे, ता.सातारा) असे त्या संशयित चोरट्याचे नाव असून त्याच्या ताब्यातून तीन चोरीच्या दुचाकी असा सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज वाई पोलिसांनी हस्तगत केला आहे.

याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असुन, ती दुचाकी चोरी करणारा संशयित हा वाई एमआयडीसी मधील सुप्रीम बिअर बार याठिकाणी येणार असल्याची माहिती खास खबऱ्या कडून वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना मिळाली. त्यांनी वाई तपास पथकातील अधिकारी, अंमलदार यांनाया संशयितास ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. वाई तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांनी वाई एमआयडीसीमधील सुप्रीम बिअर बारच्या परिसरात सापळा रचुन संशयित आदेश धनावडे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दि.१६मार्च २०२४ रोजी सुलतानपुर (ता. वाई) येथुन लाल काळ्या रंगाचे डिस्कव्हर वाहन क्र एम.एच. ११ बी.एन. ७७६८ ही चोरुन नेल्याची कबुली दिली. तसेच यापुर्वी मच्छी मार्केट वाई येथुन अॅक्टीव्हा वाहन क्र एम.एच. १२ एफ.एस. ११८९ ही व मांढरदेव (ता. वाई) येथुन एचएफ डिलक्स वाहन क्र एम.एच.११ सी.झेड. ३५१८ ही चोरुन नेल्याचे सांगितले. याबाबत वाई पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. अशी एकुण १ लाख ८० हजार रुपये किंमतीची तीन दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. ही कारवाई ही पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहा. पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण, सुधीर वाळुंज, पोलीस हवालदार मदन वरखडे, अरुण पाटणकर, उमेश गहीण, अजित जाधव, पो.ना कुंभार, पो. शि. राम कोळी, प्रसाद दुदुस्कर, नितीन कदम, हेमंत शिंदे, विशाल शिंदे यांनी केली आहे. पोलीस अधिक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी वाई तपासपथकाचे अभिनंदन केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला