तापोळा येथील शिवसागर जलाशयावर अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित पुलाच्या कामास अखेर सुरुवात

महाबळेश्वर - पर्यटन वाढीला चालना देणारा तापोळा येथील शिवसागर जलाशयावर अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित पुलाच्या कामास अखेर सुरुवात झाली. केबल स्टे पूल, त्यावर ४३ मीटर उंचीवर प्रेक्षागॅलरी असलेल्या ५४० मीटर लांबीच्या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणताही गाजावाजा न करता सुरू केले असून, हा पूल दोन वर्षांत पूर्ण होणार आहे.

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. दर वर्षी येथे सुमारे २० लाख पर्यटक भेट देऊन निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तत्कालीन ठाकरे सरकारने तापोळा येथील शिवसागर जलाशयावर तापोळा ते अहीर दरम्यान पूल बांधण्याचा निर्णय घेतला. शिवसागर जलाशयापलीकडील अहीर या ठिकाणी जाण्यासाठी या पुलाचा फायदा होणार आहे. सुमारे १३ किलोमीटर अंतर कमी होणार आहे. याचा फायदा जलाशयापलीकडे असलेल्या लोकांना तापोळा, महाबळेश्वर व सातारा या ठिकाणी जवळच्या मार्गाने जाता येईल.

 
वाहतुकीसाठी सध्या वापरात असलेला धोकादायक जलप्रवास टाळता येईल. शिवाय वेळेचीही बचत होईल. पुलामुळे सोळशी खोरे, कांदाटी खोरे व कोयना खोरे यांचा काही भाग जवळच्या मार्गाने जोडला जाणार आहे. सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील, तसेच सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील शेती कुटीर उद्योगास चालना मिळण्यास पुलाची मदत होणार आहे. नैसर्गिक आपत्तीवेळी जलाशयापलीकडील गावात मूलभूत सोई-सुविधा तातडीने पोचविणेही शक्य होणार आहे. महाबळेश्वर तालुक्यातील सुप्रसिद्ध उत्तरेश्वर मंदिर हे देवस्थान जवळच्या मार्गाने जोडले जाणार आहे. शिवसागर जलाशयावर होणारा हा पूल देशी- विदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत निश्चितच वाढ होण्यास मदत होईल.

...असा असेल पूल

पुलाच्या बांधकामाला १७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तापोळा ते अहीर असा ५४० मीटर लांब १४ बाय १५ मीटर रुंद असा हा पूल आहे. शिवसागर जलाशयात पूर्ण क्षमतेने पाणी भरल्यानंतर त्या पाण्याच्या पातळीपासून केबल स्टे पूल हा ११ मीटर उंच असेल. पुलाच्या दोन्ही बाजूला २ बाय ६५ मीटर लांबीचे फूटपाथ असणार आहे. पुलाच्या मध्यभागी पायलॉनवर पुलापासून ४३ मीटर उंचीवर प्रेक्षागॅलरी बांधण्यात येईल. प्रेक्षागॅलरीवर उभे राहून पर्यटकांना तापोळा परिसरातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येईल. प्रेक्षागॅलरीवर पोचण्यासाठी दोन्ही बाजूला कॅप्सूल लिफ्ट, तसेच जिनादेखील तयार केला जाणार आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला साडेपाच मीटर रुंदीचे डांबरी रस्ते तयार करण्यात येतील. पर्यटकांसाठी तापोळा येथे वाहनतळ बांधण्यात येईल. तापोळा व अहीर या दोन्ही ठिकाणीही सुलभ शौचालयाचीही सोय केली जाणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला