जिल्हा परिषद नगररचना विभागात रंगली सामूहिक बिर्याणीची पार्टी.
Satara News Team
- Thu 22nd May 2025 10:49 am
- बातमी शेयर करा

सातारा :गेल्या काही दिवसापासून सातारा जिल्हा परिषद कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय बनला आहेत्यातच सातारा जिल्हा परिषदेच्या विस्तारीत इमारतीमधील पहिल्या मजल्यावर नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागात बुधवारी दुपारी बिर्याणीचा सुगंध दरवळल्याने पार्टी बहाद्दरांची कमालच दिसून आली. बाहेर धो धो पावसाने जनतेची तारांबळ उडाली असताना टीपीत आत कर्मचार्यांची व अधिकार्यांची पातेले घेवून पळापळ सुरु होती. त्यामुळे पार्टी करणार्या संबंधित अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कामानिमित्त आलेल्या नागरिकांमधून होत आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या विस्तारीत इमारताच्या पहिल्या मजल्यावर नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग व सहाय्यक संचालक नगररचना सातारा यांचे कार्यालय आहे. त्यामुळे या कार्यालयात नेहमीच नागरिकांची कामानिमित्त वर्दळ असते. बुधवारीही कार्यालयात नेहमीप्रमाणे नागरिकांची गर्दी होती. तसेच पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने नागरिकही कार्यालयात बराच वेळ बसून होते. मात्र दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास भर पावसात एक अलिशान गाडी पाणी व स्वच्छता कार्यालयाच्या समोर आली. त्यावेळी अलिशान गाडीतून एक नागरिक उतरला. त्या अलिशान वाहनातून बिर्याणीचे पातेले काढून त्याने तडक पहिल्या मजल्यावर असलेल्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्या कार्यालयाकडे धाव घेतली.
त्यानंतर एका दालनात तो कर्मचारी बिर्याणीचे पातेले ठेवून बाहेर आला. त्यानंतर एक कर्मचारी पत्रावळ्या, ग्लास, द्रोण व अन्य साहित्य घेवून गेला. नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागातील सर्वच कर्मचार्यांना बिर्याणी देण्यात आल्याने झेडपीच्या विस्तारीत इमारत परिसरात बिर्याणीचा खमंग दरवळू लागला. बाहेर पाऊस सुरू असताना कार्यालयात मात्र अधिकारी व कर्मचार्यांनी बिर्याणीवर चांगलाच ताव मारला. कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी बिर्याणी पार्टीत व्यस्त असताना कामानिमित्त आलेल्या नागरिकांची मात्र गैरसोय झाली.
या कार्यालयात वारंवार पार्ट्या झोडल्या जात असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. भर कामाच्या वेळेत जर पार्ट्यांचे नियोजन कार्यालयात होत असेल तर नागरिकांची कामे वेळेत होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. याबाबत वरिष्ठांनी दखल घेवून संबंधित पार्टी झोडणार्या अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई केली पाहीजे.
या पार्टीचं कारण म्हणजे जिल्हा परिषदेच्या विस्तारीत इमारतीमधील पहिल्या मजल्यावर नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागात कार्यरत असणार्या 4 ते 5 कर्मचार्यांची बदली . महाबळेश्वरमधील एकाने या पार्टीचे सर्व नियोजन केले होते, त्यामुळे या कर्मचार्यांनी सामूहिक बिर्याणीची पार्टी दिली असल्याची चर्चा जिल्हा परिषद परिसरात रंगली होती.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Thu 22nd May 2025 10:49 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Thu 22nd May 2025 10:49 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Thu 22nd May 2025 10:49 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Thu 22nd May 2025 10:49 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Thu 22nd May 2025 10:49 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Thu 22nd May 2025 10:49 am
संबंधित बातम्या
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Thu 22nd May 2025 10:49 am
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Thu 22nd May 2025 10:49 am
-
अजंठा चौकात टपरी चालकाचे नगरपालिकेला आव्हान
- Thu 22nd May 2025 10:49 am
-
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील ०३ खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघातुन निवड
- Thu 22nd May 2025 10:49 am
-
औंध ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सिजन वर असलेल्या व्यवस्थेने घेतला नवजातचा बळी?
- Thu 22nd May 2025 10:49 am
-
सर्वसामान्य जनतेच्या मते औंध पोलिस ठाण्याचे विद्यमान कारभारी अवैध व्यवसायांच्या बाबतीत गांधारीच्या भुमिकेत
- Thu 22nd May 2025 10:49 am
-
पुसेसावळी येथे पतसंस्थेच्या नावाखाली खाजगी सावकारीचा धंदा सुरू
- Thu 22nd May 2025 10:49 am
-
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Thu 22nd May 2025 10:49 am