खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
मा.तहसिलदार यांनी ध्वजाचा अवमान केल्याने गुन्हा दाखल करणेची आवश्यकताआशपाक बागवान
- Tue 27th Jan 2026 06:27 pm
- बातमी शेयर करा
पुसेसावळी : भारताने ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ध्वज उघडला (unfurl), महाराष्ट्रातही प्रत्येक सरकारी कार्यालयात, शाळेत, तालुक्यात हाच नियम काटेकोरपणे पाळला गेला असेल. पण खटाव तालुक्यातील तहसिल कार्यालय (वडूज) मध्ये एक वेगळीच "क्रांती" घडली!
मा.तहसिलदार बाई माने यांच्या हस्ते सकाळी ९:१५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले! होय, ध्वजारोहण – म्हणजे ध्वज खाली बांधून वर खेचणे, जे फक्त १५ ऑगस्टला (स्वातंत्र्य दिन) करायचे असते. प्रजासत्ताक दिनी तर ध्वज आधीच वर असतो, फक्त गुंडाळी उघडून (unfurl) फडकवायचा असतो. हे प्रतीक आहे – स्वातंत्र्य मिळवण्याची लढाई संपली, आता प्रजासत्ताकाची निरंतरता चालू आहे.
पण खटावच्या विद्यमान तहसिलदारांना आज जनतेला कदाचित सांगायचे असेल की, "अरे, आम्ही तुम्हाला आजच नवं स्वातंत्र्य मिळवून देतोय! १९४७ ची आठवण आज २०२६ मध्ये ताज्या दाखल करून देतो!" परिणामी, खटावच्या जनतेला एकाच दिवसात दोन स्वातंत्र्य मिळाले. एक १५ ऑगस्टचा खरा, आणि दुसरा ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा "बोनस" स्वातंत्र्य!
सदरच्या ठिकाणी, वेळी मा.तहसिलदार बाई माने यांनी ध्वजारोहण केले, मानवंदना दिली.स्वातंत्र्य सेनानी उत्तराधिकारी, वीर माता, वीर पत्नी, वीर बंधूंचा सन्मान.पोलिस प्रशासनानेही सलामी.विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, पथनाट्य सादर केले. पण कुठे तरी "ध्वजवंदन" ऐवजी "ध्वजारोहण" चाच शब्द ही वापरला गेला आणि कृती ही केली गेली.मात्र उपस्थित अधिकारी, शिक्षक, व्यापारी, राजकीय,सामाजिक, नेते सगळे आनंदात,पण नियमांची आठवण कुणालाही आली नाही का?
मा.तहसिलदारांनी खटावच्या जनतेला ७७ व्या प्रजासत्ताक दिनी नेमकं कसं स्वातंत्र्य मिळवून दिले? की फक्त ध्वज संहितेचे उल्लंघन करून "स्वातंत्र्य" ची नवी व्याख्या सांगितली? Flag Code of India २००२ आणि Prevention of Insults to National Honour Act, १९७१ नुसार हे तांत्रिकदृष्ट्या अपमानास्पद आहे. पण अपघाती असल्यास फक्त चेतावणी दिली जाते तरीही, तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी या तालुक्यातील मुख्य प्रशासकीय पदांवर कार्यरत असलेल्या उच्च विद्याविभूषित सरकारी अधिकाऱ्याने हे केल्याने संबंधित वरिष्ठ अधिकारी या घटनेनंतर असे अपमानास्पद कृत्य करणाऱ्या मा. तहसिलदार यांचेवर फक्त सुचना देण्यात धन्यता मानतात कि सुओ मोटो अंतर्गत गुन्हा दाखल करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नियम शिकवणारे स्वतः ध्वज संहिता नियम विसरले? अशा प्रकारच्या प्रश्नांसह जनसामान्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
मा. तहसिलदारांच्या मते खटावमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन नव्हता, तर "स्वातंत्र्य दिन २.०" साजरा झाला असावा! पुढच्या वर्षी कदाचित तहसिलदार म्हणतील, "आम्ही २६ जानेवारीला १५ ऑगस्ट आणि १५ ऑगस्टला २६ जानेवारी करून बॅलन्स राखतोय!" त्यामुळे हुतात्म्यांच्या या खटाव तालुक्यातील जनतेकडून त्यांना विनंती आहे. ध्वज हा अभिमान आहे, त्याचे प्रतीक समजून घ्यावी, ध्वज संहिता बघावी त्यासोबतच केलेल्या कृती बद्दल जनतेची जाहीर माफी मागावी आणि विनंती करून मा.तहसिलदार बाईंनी पुढच्या वर्षी unfurl करावे, hoist नव्हे! अन्यथा खटावला "स्वातंत्र्य" मिळेल, पण नियमांचे "बंधन" वाढेल!
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 27th Jan 2026 06:27 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 27th Jan 2026 06:27 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 27th Jan 2026 06:27 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 27th Jan 2026 06:27 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 27th Jan 2026 06:27 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 27th Jan 2026 06:27 pm
संबंधित बातम्या
-
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 27th Jan 2026 06:27 pm
-
फलटणच्या विमानतळावरील पालखीतळाचे पहाणी न करताच विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची पावले पंढरीच्या दिशेने
- Tue 27th Jan 2026 06:27 pm
-
शेडगेवाडी पोलीस पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला...
- Tue 27th Jan 2026 06:27 pm
-
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 27th Jan 2026 06:27 pm
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Tue 27th Jan 2026 06:27 pm
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 27th Jan 2026 06:27 pm
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Tue 27th Jan 2026 06:27 pm
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Tue 27th Jan 2026 06:27 pm











