औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?

पुसेसावळी : औंध पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ३२ च्या आसपास असली तरी कार्यक्षेत्राचा आणि गुन्हेगारीचा आलेख पाहता कर्मचारी संख्या अत्यल्पच त्यातही येत्या काळात अंदाजे पाच कर्मचाऱ्यांची बदली झाल्याने इतर ठिकाणी रूजू होण्याची शक्यता आहे. तर बदल्यांच्या बदलात औंध पोलिस स्टेशनमध्ये नव्याने येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या घसरणीवर आहे. त्यामुळे नागरिकांचा आणखीनच खोळंबा होणार असल्याची शंका नाकारता येत नाही. सध्याची परिस्थिती पाहता कार्यरत कर्मचाऱ्यांना निकडीच्या गरजेला सुट्टी मिळत नसल्याची धुसफूस कर्मचारी वर्गामध्ये सुरू असल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे कारभाऱ्यांना मनसोक्त सुट्टी असून ड्युटी मात्र कागदोपत्रीच असल्याचे स्टेशन ला कार्यरत असलेले काही कर्मचारी सांगतानाही दबावाखाली असल्याचे तसेच नाव न सांगण्याच्या अटीवर बोलत आहेत. साहेबांची स्टेशन मधील हजेरी म्हणजे "युं आये, युं गये" अशी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. साहेबांचा कॉल कोणीही देत असून ना विलाजाने तो घ्यावाच लागतो. याचाच अर्थ मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? असा घेणे चुकीचे ठरेल असे वाटत नाही. 

 औंध मतदार संघ माण-खटाव च्या कार्यक्षेत्रात येत असून या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत याबरोबरच सोलापूर चे पालकमंत्री पदावरही कार्यरत आहेत. त्यांचे कार्य ते इमानेइतबारे करित असले तरीही स्थानिक मतदार संघातील या पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्यांवर मंत्री गोरे "अंकुश" ठेवणार? कि संबंधित कारभाऱ्यांच्या हजेरीबाबत स्टेशन डायरीसह सिसीटिव्हीची पडताळणी करत सखोल चौकशी करून कर्तव्यात कसूर केल्याने "दोषी" ठरवत कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब बदली सारखी कारवाई करून हतबल कर्मचारी आणि नागरिकांना दिलासा देणार? असे प्रश्न पिडित नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत.


औंध पोलिस ठाण्याला दोन अविनाश पण् अवैध व्यवसायीकांना कनिष्ठाचे "भय" तर वरिष्ठाचे "अभय". औंध पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील बहुतांश ठिकाणी गुटखा, मटका, गांजा, जुगार, चक्री, सोरट आणि अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या अवैध व्यवसायांना सहाय्यक पोलिस निरीक्षक 'अविनाश मते' यांच्या कालावधीत सोन्याचे दिवस आले असल्याची चर्चा सुरू असतानाच औंध पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या पुसेसावळी दुरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक अविनाश वाघमारे यांनी 'सद् रक्षणाय खलनिग्रहणाय' ला साजेशी कामगिरी करत पुसेसावळी दुरक्षेत्राच्या हद्दीतील अवैध व्यवसायांच्या मुसक्या आवळत कायदा सर्वांसाठी समान असल्याचे कृतीतून दाखवून देत विश्वास संपादन केला आहे. परंतू अपवादात्मक परिस्थितीत वरिष्ठ असलेल्या अविनाश मते यांचे "अभय" असलेले अवैध व्यवसाय बंद करणे अशक्य झाले असल्यानेच कनिष्ठ अविनाश चे भय वरिष्ठ अविनाशचे अभयापुढे गुडघे टेकताना दिसून येत असल्याची चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे अवैध व्यवसायीक कोणासाठी "सोन्याचे अंडे देणारी कोंबडी" ठरत आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
औंधच्या कारभाऱ्यांचे हात न्याय देण्यासाठी आखडतात तर इतरत्र पसरतात? औंध पोलिस स्टेशन मध्ये विद्यमान कारभाऱ्यांच्या कार्यकाळात दिलेल्या बहुतांश तक्रारी अर्जांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्रिमली येथील जन्मतः दोन्ही हात नसलेल्या नवनाथ महाडिक नामक युवकाने सुमारे आठ महिन्यांपूर्वी लगतदार रहिवासी असलेल्या इसमांकडून शिवीगाळ होत असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संबंधित पिडितास अनेकवेळा औंध पोलिस ठाण्यात जाऊनही कारभारी उपस्थित नसल्याचा तसेच एकवेळ विद्यमान कारभाऱ्यांकडून "तूम्ही तूमच्या परिने कहिही करा" असे सांगितल्याने संबंधित तक्रारदाराने आपले सरकार पोर्टल वर विद्यमान कारभारी अविनाश मते यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संबंधित तक्रारदारास औंध पोलिस ठाण्यात बोलावून त्रास देणाऱ्यावर कारवाई चे आश्वासन देत सदरचा अर्जाबाबत माझी हरकत नाही अशा प्रकारे जबाब नोंदवून सदरची तक्रार फाईल करण्यात आल्याची माहिती पिडिताने सातारा न्यूज प्रतिनिधी आशपाक बागवान यांना फोन करून दिली. त्यामुळे जन्मतः हात नसलेल्या नवनाथ महाडिक या पिडिताला "कानून के हाथ लंबे होते है" परंतू न्याय देण्यासाठी कि आणखी कोणत्या कामासाठी? हा प्रश्न नक्कीच पडला असणार यात शंका नाही.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला