सातारा -मोटर सायकल चोरटा बोरगाव पोलीसांच्या ताब्यात.. अनेक गाड्या झाल्या रिकव्हर
बोरगाव पोलीसांची धडाकेबाज कामगिरीSatara News Team
- Mon 6th Mar 2023 08:39 pm
- बातमी शेयर करा

सातारा ; सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र तेलतुंबडे यांनी पोलीसी खाक्या दाखवत प्रश्नांची सरबत्ती केल्याने गुन्हे आले उघडकीस दिनांक ०५/०३/२०२३ रोजी सायंकाळी 06 वाजण्याच्या सुमारास मौजे नांदगाव ता जि सातारा गावच्या हद्दीत बोरगाव पोलीस ठाणे डि बी पथकाचे पोलीस नाईक स्वामी पो ना २२०२ पो ना निकम ब.नं. ७८४, पोना शिखरे बनं २२०९ पाई पेट्रोलींग करीत असताना कृष्णा नदीवरील पुलाच्या पश्चिम बाजुस पुलाच्या कठड्यावर एक इसम समोरच मोटर सायकल उभी करून बसलेला होता,आम्ही त्याच्या समोरुन जाण्याच्या तयारीत असताना त्यास आमची चाहुल लागताच तो लगबगीने मोटर सायकल सोडुन नदी काठी पळुन जात असताना त्यास पो ना शिखरे ब.नं. २२०९ यानी जागीच पकडले व त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या ताब्यात असलेली मोटर
सायकल क्रमांक एम एच ११ -डि ई ७६५८ हि सुमारे अडिच महिन्यापूर्वी कोपर्डे ता जि सातारा येथून सकाळी ०६.०० वाजण्याच्या सुमारास चोरून नेहली असुन ती तो वापरत असल्याचे सांगितले त्यामुळे नमुद कर्मचारी यांनी सदर व्यक्तिचा बोरगाव पोलीस ठाणे गुरनं ३०४/२०२२ भा.दं.वि
कलम ३७९ या गुन्हयात सहभाग असल्याने सदर गुन्हयाचे तपासकामी अटक केली. व त्याच्या ताब्यात मिळालेली मोटर सायकल जप्त केली. आज रोजी सदर आरोपीस सपोनि श्री रविंद्र गजानन तेलतुंबडे व पोलीस नाईक स्वामी बन २२०२ यांनी अधिक विश्वासात घेवुन त्याच्याकडे तपास केला असता त्याने व त्याचा मित्र आकाश प्रकाश चव्हाण रा जुनाबुधगावरोड वाल्मिकी वसाहत असे दोघांनी ४ महिन्यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरलेल्या मोटर सायकली विक्री करण्याकरीता एका ठिकाणी जमा केलेल्या आहेत. असे सांगुन ६ मोटर सायकली तारगाव ता कोरेगाव जि सातारा गावचे हद्दीतुन नदी काठालगत असलेल्या नदीपुल नावचे शिवारातुन झाडा झुडपातून सुमारे ५.१४,०००/- रू किंमतीच्या एकूण ७ मोटर सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदरच्या मोटर सायकली सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतुन-१, बोरगाव पोलीस ठाणे हदीतून १ व सांगली बाजारपेठेतुन ५ अशा मोटर सायकली आणलेल्या आहेत.सदरची कारवाई हि मा. पोलीस अधिक्षक श्री.समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा श्री.गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस ठाणे, पो.ना स्वामी बनं २२०२, पोहवा सावंत ब नं ४९८. पो.ना निकम ब.नं. ७८४, पो.ना शिखरे बनं २२०९ पो कॉ मोरे व नं २३११ यांनी केली.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Mon 6th Mar 2023 08:39 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Mon 6th Mar 2023 08:39 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Mon 6th Mar 2023 08:39 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Mon 6th Mar 2023 08:39 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Mon 6th Mar 2023 08:39 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Mon 6th Mar 2023 08:39 pm
संबंधित बातम्या
-
वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.
- Mon 6th Mar 2023 08:39 pm
-
गुरु द्रोणा अकॅडमी फलटण येथे विद्यार्थ्यास मारहाण.
- Mon 6th Mar 2023 08:39 pm
-
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Mon 6th Mar 2023 08:39 pm
-
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Mon 6th Mar 2023 08:39 pm
-
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Mon 6th Mar 2023 08:39 pm
-
वरकुटे-मलवडीत जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांचा छापा; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- Mon 6th Mar 2023 08:39 pm
-
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Mon 6th Mar 2023 08:39 pm
-
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Mon 6th Mar 2023 08:39 pm