भीमाची वाघीण बनुबाई येलवे आजींना अखेरचा रिपाइं पक्षाचा जय भिम

सातारा : डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिकवणीचा वापर आपल्या जीवनात करून चळवळीसाठी झटणाऱ्या  भीमाची वाघीण बनुबाई येलवे आजींना अखेरचा रिपाइं पक्षाचा जय भिम करण्यात आला. खटाव तालुक्याच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष कृणाल गडांकुश यांनी बनुताई येवले यांच्या कार्याला आठवणीतून उजाळा दिला.

     महाराष्ट्रात पंधरा वर्षांपूर्वी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी मागासवर्गीय आरक्षणाच्या कुबड्या किती दिवस हव्यात?असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांना रोखठोक पद्धतीने जाब विचारण्यासाठी बनुताई येवले निळा झेंडा घेऊन कराडच्या टॉवन हॉल मध्ये शिरल्या होत्या. ते वाघिणीचे रूप व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे हे वाक्य सुनावले होते.आज शालिनीताई पाटील यांच्याच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी रिपाइं व स्वतः बनुताई येवले यांनी करून समतेचा खरा नारा दिला होता.आज वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर जागा व्यापून टाकणारे नेते कुठेच दिसत नाही पण, बनुताई येवले यांच्या जाण्याने पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता हळहळ व्यक्त करीत आहेत. रिपाइं सर्वच नेत्यांचा आदर करणाऱ्या बनुताई येवले यांनी अखेरपर्यंत निळ्या झेंड्याला कवटाळले होते. आदरणीय नेते रामदास आठवले साहेब यांच्या भेटीने त्यांना अधिकच चैतन्य निर्माण होत असे. त्यांच्या आजारपणात त्यांना मदत करण्यासाठी अनेक जण सरसावले. पण, काहींनी मदत करण्यासाठी थोडे पुढे आले असते तर बरे झाले असते. अशी भावना गोरगरीब रिपाइं कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत.

            हातात निळा झेंडा घेतलेल्या बनुबाईंनी अनेक अन्याय-अत्याचारग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ऊन, वारा, पाऊस याची तमा न करता काम केले होते.अनेक विधवांना शासकीय पेन्शन मिळवून दिली,नवरा नांदवत नसलेल्या स्त्रियांचा संसार पुन्हा उभा करून दिला,शासकीय स्वस्त धान्याचा प्रश्न असो किंवा विद्यार्थ्यांच्या अनेक दाखल्याचा प्रश्न असो, त्यांनी तो लोकशाही पद्धतीने आंदोलन करून सोडवला.कोणत्याही प्रकारच्या मोबदला न घेता काम करणाऱ्या बनुताई येवले आजी आता पुन्हा या पिढीला दिसणार नाही. घरची परिस्थिती बदलली पाहिजे याचा कधी ही त्यांनी विचार केला नाही. तसेच रिपाइं एका गटातून दुसऱ्या गटात जाण्याचा विचार केला नाही. प्रसिद्धी मिळाली पाहिजे असा त्यांचा कधीही आग्रह नव्हता पण, आंदोलनातून त्यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. आज काही भुरट्या कार्यकर्त्यानी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन नव्हे घोषणाबाजी केली तरी त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे अशा वेळी रिपाइं वाघीण बनुताई येवले यांच्या आक्रमक भूमिका व प्रामाणिकपणे केलेल्या आंदोलनाची दखल घेणाऱ्या प्रसार माध्यमांचे नवल वाटत आहे. अशी ही प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे धाडस करणाऱ्या बनुताई येवले यांचा आदर्श आज कराड तालुक्यातील खेड्यापाड्यात घेतला जात आहे. ही त्यांच्या कार्याची दखल मानली जात आहे.त्यांची मुलगी कमल सावंत यांनी सांगते की,"आई अडाणी होती,पण एक दिवस वाघ होऊन जगा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य तिने ऐकलेले होते.ती आयुष्यभर स्वाभिमानाने जगली.कुणापुढे झुकली नाही.वाळू तस्कर आईला देण्यासाठी मोठ्या रकमा घेऊन यायचे पण,तो पैसा तिने कधीच स्वीकारला नाही.ती गरिबीत जगली,पण वाघासारखी स्वाभिमानाने जगली".बनुबाई येवले यांनी त्यांच्या तरुणपणात स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष करून समाजासाठी अहोरात्र झटल्या.यावर त्यांचा मुलगा किरण उद्विग्न आणि मार्मिक प्रश्न करते,"ज्या समाजासाठी आईने स्वतःचे आयुष्य खर्च केले,त्या समाजाने तिला काय दिले?या पडक्या मातीच्या भिंती?हे गळके घर?कि आई ज्या ठिकाणी झोपते ती झिरपणारी जमीन?आयुष्यभर प्रामाणिक काम करणाऱ्या आईला शेवटचे आयुष्य काढायला साधे नीटके घर नाही कि त्या घरात झोपायला जागा नाही"हा समाज्याला विचारलेला प्रश्नांची उत्तरे सर्वांनाच शोधून दयावी लागणार आहे. तरच खऱ्या अर्थाने आदरणीय बनुताई येवले यांनी केलेल्या कार्याला मानवंदना ठरेल अशी ही भूमिका आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यानी घेतली असल्याचे समजते. अशा या वाघिणीला भीमसैनिकांचा अखेरचा सलाम करण्यासाठी विविध ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम होत आहे.रिपाइं जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, अशोक मदने, आप्पासाहेब गायकवाड,आप्पा तुपे, प्राणलाल माने अशा अनेक नेत्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. खटाव तालुक्याच्या वतीने रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती सरतापे,श्रीमती मसणे, कृणाल गडांकुश, गणेश भोसले, अजित कंठे, संतोष भंडारे, दत्ता शिंदे तसेच मनसेचे सुरज लोहार, शिवसेनेचे सौ राणी काळे, वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तुषार बैले, प्रतिक बडेकर, भाजपचे बबनराव कांबळे,काँग्रेसचे आनंदा साठे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दाऊद खान मुल्ला, दत्ता केंगारे आदींनी बनुताई येवले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

बनुताई येवले यांचा फोटो

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला