सराईत गुन्हेगार दीपक मसुगडे टोळी दहिवडी पोलिसांकडून जेरबंद

आंधळी : मलवडी ता. माण येथे चोरी,रॉबरी, खुनाचा प्रयत्न, महिलांवर अत्याचार तसेच परिसरात दहशत पसरवणारी दीपक मसुगडे व त्याची टोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व सहकारी यांनी धडक कारवाई करत टोळीस जेरबंद केले. 

 याबाबत दहिवडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मलवडी ते परकंदी जाणाऱ्या रोडवर मंगेश जाधव यांच्या हॉटेल समोर फिर्यादी प्रवीण शिवाजी सत्रे व्यवसाय अर्थमूव्हर्स , रा. सत्रेवाडी, ता. माण हा थांबला असताना पाठीमागून लाल रंगाच्या मोटरसायकल वरून येऊन सराईत गुन्हेगार दीपक नामदेव मसुगडे, सुरज कैलास जाधव, महेश आप्पासो जाधव सर्व रा. नवलेवाडी ता. माण यांनी फिर्यादीस लाटा भुकेने मारहाण करून त्याच्या हातातील तीन हजार तीनशे रुपये किमतीचे चांदीचे ब्रासलेट जबरीने घेऊन मोटरसायकलवर निघून गेले याबाबत फिर्यादीने दहिवडी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने दहिवडी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हातील आरोपीचा मलवडी परिसरामध्ये शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यास अटक करण्यात आली. 

 पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे, महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे, स्वाती धोंगडे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार, गुलाब दोलताडे, पोलीस कॉन्स्टेबल आजिनाथ नरभट, महेंद्र खाडे, निलेश कुदळे,गणेश खाडे यांनी कारवाई केली. सदर गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला