गटारातील अस्वच्छतेमुळे गावाला रोगराईचा विळखा

वावरहिऱ्यात गटारगंगेचा उगम ग्रामप्रशासन तरीही आंधळ्याच्या भूमिकेत

वावरहिरे ता. माण, येथील गटारांची झालेली दयनीय अवस्था आणि त्यातून पसरलेली कमालीची अस्वच्छता यामुळे गावाला रोगराईचा विळखा बसू लागला आहे त्यातच भर म्हणून अनेक लोक आजारीही पडले आहेत.

गावातील लोकांनी याबाबत ग्रामप्रशासनाला वेळोवेळी कळवून , विनंती करून देखील ग्रामप्रशासनाने याकडे कानाडोळा केला आहे, परिणामी गटारांची ही दुर्दशा होऊन गटारातील अस्वच्छतेमुळे नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या गटारांची व्यवस्था नीट करून त्याची योग्य विल्हेवाट कोण लावणार हा प्रश्न गावातील नागरिकांसमोर उभा आहे.

त्या गटारामध्ये पडलेल्या आळ्या, घाण ,विविध कीटक ,उपद्रवी घटक,डास इत्यादीमुळे गावाभोवती रोगराईचा फास अजूनच आवळताना दिसून येतो आहे. गटारा शेजारून रस्त्यावरून चालताना प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. लोकांना या दुर्गंधीमुळे रस्त्यावरून चालणे ही मुश्किल झाले आहे. त्यामुळे वावरहिरे ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, सर्व सदस्य हे आपली जबाबदारी ओळखून गावाला रोगराई पासून वाचवणार का? हा प्रश्न गावातील नागरिकांना पडला आहे.

 

वावरहिरे ग्रामप्रशासन आंधळ्याची भूमिका सोडणार का?

गावातील सरपंच ग्रामसेवक आणि सदस्य यांना ही अस्वच्छता माहित असूनदेखील त्यांनी लोकांच्या विनंतीकडे वेळोवेळी दुर्लक्ष केले आहे. सगळं माहीत असताना आंधळ्याची भूमिका घेतलेले वावरहिरे ग्रामप्रशासन आता तरी जागे होणार का हा प्रश्न गावातील नागरिकांसमोर उभा आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला