उरमोडी धरणात पोहताना बुडालेल्या 2 युवकांचे मृतदेह शोधण्यात शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला यश
Satara News Team
- Tue 30th May 2023 11:55 am
- बातमी शेयर करा
सातारा : उरमोडी धरणात रविवारी सायंकाळी साताऱ्यातील सदर बाजार येथील बुडालेल्या दोन्ही युवकांचे मृतदेह शोधण्यात शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला यश आले आहे.आकाश साठे आणि सौरव चौधरी अशी दोघा मित्रांची नावे आहेत.आज सोमवारी सकाळपासूनच या दोघांचा उरमोडी पात्रात शोध घेण्याचे सुरू केल्यानंतर दुपारी आकाश रामचंद्र साठे याचा मृतदेह मिळून आला तर सौरभ सुनील चौधरी याचा संध्याकाळच्या सुमारास मृतदेह सापडला.उरमोडी धरण परिसरामध्ये दोघेही फिरण्यासाठी गेले होते रविवारी सायंकाळी दोघेही धरणात पोहण्यासाठी उतरले त्यावेळी पोहताना दम लागल्याने ते बुडाले असल्याची माहिती समोर आली. दोन्ही युवक सदर बाजार येथील रहिवासी असल्यामुळे दोघांच्या नातेवाईकांसह परिसरातील मित्र परिवाराने मोठी गर्दी उरमोडी परिसरात केली होती. या शोध मोहिमेत शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम यांच्यासह सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके हे सहभागी होऊन दोन्ही युवकांचे मृतदेह 24 तासाच्या आत शोधून काढले या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 30th May 2023 11:55 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 30th May 2023 11:55 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 30th May 2023 11:55 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 30th May 2023 11:55 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 30th May 2023 11:55 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 30th May 2023 11:55 am
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Tue 30th May 2023 11:55 am
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Tue 30th May 2023 11:55 am
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Tue 30th May 2023 11:55 am
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Tue 30th May 2023 11:55 am
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Tue 30th May 2023 11:55 am
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Tue 30th May 2023 11:55 am
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Tue 30th May 2023 11:55 am
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Tue 30th May 2023 11:55 am













