महाबळेश्वरच्या लॉडविक पॉईंटवर उडी मारून व्यक्तीची आत्महत्या
अजीत कुम्भरदरे
- Thu 19th Dec 2024 07:03 pm
- बातमी शेयर करा
महाबळेश्वर : महाबळेश्वरच्या लॉडविक पॉईंटवर उडी मारून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला: ट्रेकर्स व रेस्क्यू टीमचा संघर्षपूर्ण मदत कार्य आज, १९ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता महाबळेश्वर ट्रेकर्स चे सदस्य सुनील बाबा भाटिया यांचा कॉल आला की, महाबळेश्वर येथील प्रसिद्ध लॉडविक पॉईंट वर एका व्यक्तीने कड्यावरून उडी मारली आहे आणि त्याला बाहेर काढण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे.
यानंतर, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम च्या सदस्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. टीमचे सदस्य ५५० फुट खोल दरीत उतरून मदत कार्यात सहभागी झाले.
महाबळेश्वर ट्रेकर्स चे कुमार शिंदे, सोमनाथ वागदरे, अमित कोळी, सौरभ गोळे, जयवंत बिरामणे, अमित झाडे, सौरव सालेकर, सुजित कोळी, आतेश धनावडे, अनिल लांगी, सूर्यकांत शिंदे, सुजित कोळी, मंगेश सालेकर, दीपक ओंबळे, अक्षय नाविलकर, सचिन डोईफोडे आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अनिकेत वागदरे व आशिष बिरामणे यांचा सामील झाला.
या अथक प्रयत्नांनंतर, दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला गेला. या धाडसी मदत कार्यामुळे ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीमला त्यांचा उद्देश सफल करण्यात यश आले.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 19th Dec 2024 07:03 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 19th Dec 2024 07:03 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 19th Dec 2024 07:03 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 19th Dec 2024 07:03 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 19th Dec 2024 07:03 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 19th Dec 2024 07:03 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Thu 19th Dec 2024 07:03 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 19th Dec 2024 07:03 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Thu 19th Dec 2024 07:03 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Thu 19th Dec 2024 07:03 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Thu 19th Dec 2024 07:03 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Thu 19th Dec 2024 07:03 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Thu 19th Dec 2024 07:03 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Thu 19th Dec 2024 07:03 pm













