आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक

सातारा :  भारतीय जनता पक्षाचे सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक वरील Chh.ShivendraRaje Bhonsle हे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने हॅक केले आहे. याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या जनसंपर्क कर्यालयाकडून रीतसर तक्रार करण्यात आली असून संबंधित हॅकरवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

असंख्य फॅन फॉलोईंग असलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या फेसबुक पेजवर दररोज आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या चालू घडामोडी, कार्यक्रम प्रसिद्ध केल्या जातात. मात्र गेल्या तीन- चार दिवसापासून ऍडमिनचा अक्सेस काढून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पेजवर सर्च केल्यानंतर सदरचे पेज हॅक केल्याचे स्पष्ट झाले. याबातची रीतसर तक्रार सातारा सायबर सेलकडे करण्यात आली असून सदर पेजवर कोणतीही अनधिकृत पोस्ट पडल्यास त्यास समबंधित हॅकर जबाबदार असेल. तसेच अनधिकृत पोस्ट पडल्यास आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते, प्रेमी, फॅन्स, नागरिकांनी त्यावर कसलीही प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरील अकाउंट हॅक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. यापूर्वी सुद्धा अनेक दिग्गज व्यक्ती, नेतेमंडळी, क्रिकेटपटू यांचे सोशल मीडियावरील अकाउंट हॅक झाल्याच्या घटना आपण बघितल्या असतील. आता साताऱ्याचे श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक वरील अकाउंट हॅक झाल्याने यामध्ये भर पडली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला