विकासअण्णाची टोलनाक्यावर दादागिरी चोराच्या उलट्या बोंबा मी नाही त्यातली कडी लाव आतली

कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, टोलनाक्याचे बॅरॅकेट लाथ मारून तोडण्यात आले

सातारा :  सातारा आनेवाडी टोल नाक्यावर कायम वादाचे प्रसंग होत असून वाहन चालक व टोल कर्मचाऱ्यांची नेहमीच भांडणे वादावादी होत असते परंतु गुरुवारी याच टोल नाक्याचे माजी व्यवस्थापक विकासअण्णा शिंदे यांची कर्मचाऱ्यांच्या सोबत टोल बूथवरून गाडी सोडण्यावरून वादावादी झाली. यात विकास शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचे व टोल बूथवरील बॅरिकेटचे नुकसान केल्याची तक्रार टोल कर्मचाऱ्यांनी भुईंज पोलीस स्टेशन मध्ये केली असून गुन्हा दाखल होऊन याबाबत पोलीस पुढील केली. तपास करत आहेत.

भुईंज पोलिसांत गुन्हा दाखल

माहितीनुसार विकास शिंदे हे साताराकडे जात असताना टोल बूथ क्रमांक ९ येथे आले असता फ्री मध्ये गाडी सोडण्याची मागणी केली. मात्र तसे सोडता येत नसल्याची माहिती महिला कर्मचाऱ्यांनी दिली. याचाच राग मनात धरून त्यांनी बेरिकेटचे नुकसान केले व कर्मचाऱ्यांना देखील शिवीगाळ, दमदाटी

टोल प्रशासनाकडून मिळालेल्या विकास अण्णाची टोलनाक्यावर तोडफोड तसेच तुम्हाला सोडणार नाही अशा शब्दात दम सज्जड दम दिल्याचे व्यस्थापनाकडून सांगण्यात आले. या घडलेल्या घटनेची तक्रार टोल सुपरवायझर स्वप्नील सोनावणे यांनी भुईंज पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी रात्री उशिरा दिली असून, टोल नाक्यावर अशा घडण्या घटनांवर पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे अशी स्थानिकांची मागणी असून ज्यांनी या आधीपर्यंत टोल व्यवस्थापन सांभाळले अशीच मंडळी देखील आता टोलवर बमबाजी करू लागली आहेत. सध्याचे टोल व्यवस्थापक कुलदीप क्षीरसागर यांनी माहिती देताना सांगितले, स्थानिक असलेल्या वाहनधारकांना आम्ही सवलतीच्या दरातील पास घेण्यास वारंवार सांगत असून कोणत्याही प्रकारची अडवणूक टोल व्यस्थापनाकडून स्थानिकांना केली जात नाही. मात्र वाई शहर *स्थानिकमध्ये
येत नसल्याने विकास शिंदे यांना रितसर टोल द्यावाच लागेल. गांडी न सोडल्याचा राग मनात धरून शासकीय मालमतेचे नुकसान करणे तसेच टोल कर्मचाऱ्यांना शिवीगाळ तसेच दमबाजी करणे योग्य नसून यावर पोलीस 
प्रशासनाने वेळीच अशा प्रवृत्तीना लगाम घातला पाहिजे. विकास शिंदे यांनीदेखील स्थानिकांच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची वादावादी अथवा शिवीगाळे, दमबाजी आनेवाडी टोलनाक्यावर करू नये                   या अगोदरही आणेवाडी टोलनाक्यावर असे प्रकार भरपूर झालेले आहे   या अगोदर टोल नाक्यावर डुबलीकेट पावत्या छापलेले होते भुईंज पोलीस प्रशासनाने याकडे  योग्य ते वेळी गांभीर्यने लक्ष घातले पाहिजे  असा सवाल नागरिकांकडून होत आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला