खूनप्रकरणातील विवाहितेच्या भावांवर गुन्हा दाखल
Satara News Team
- Tue 24th Jun 2025 12:00 pm
- बातमी शेयर करा
सातारा : यादोगोपाळ पेठ येथे विवाहितेच्या खून प्रकरणातून बहिणीच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यादोगोपाळ पेठ येथे अंजली शिंदे या विवाहितेचा खून करून कॉटखाली गाठोड्यात गुंडाळलेला आढळून आला होता. अंजली शिंदे यांच्या मुलींनी कॉटखाली मुतदेह पाहिल्यानंतर मुलींनी हि बाब अंजलीचा भाऊ श्रेयस ह्याच्या निर्दशनास आणून दिली. मृतदेह पाहिल्यानंतर श्रेयस आणि अंजलीचा पती राजेंद्र शिंदे यांच्यामध्ये झटापट झाली होती. यामध्ये राजेंद्र शिंदे हा जखमी झाला होता. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पती राजेंद्र शिंदे याच्यावर अंजली शिंदे हिच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान याप्रकरणात आता अभिषेक अनिलकुमार पाटील व श्रेयस अनिलकुमार पाटील (दोघे रा. करंजे, सातारा) यांच्या विरुध्द महेश भानुदास शिंदे ( वय ४२, रा. पानमळेवाडी पो. वर्ये ता.सातारा) यांनी तक्रार दिली आहे. अंजली शिंदे या विवाहितेचा खून झाल्याप्रकरणी पती राजेंद्र शिंदे याला अजंलीचे दोन्ही भाऊ अभिषेक व श्रेयस यांनी रागाच्या भरात पाईप, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. असे तक्रारीत म्हटले आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 24th Jun 2025 12:00 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 24th Jun 2025 12:00 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 24th Jun 2025 12:00 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 24th Jun 2025 12:00 pm
संबंधित बातम्या
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Tue 24th Jun 2025 12:00 pm
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Tue 24th Jun 2025 12:00 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 24th Jun 2025 12:00 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Tue 24th Jun 2025 12:00 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Tue 24th Jun 2025 12:00 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Tue 24th Jun 2025 12:00 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Tue 24th Jun 2025 12:00 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Tue 24th Jun 2025 12:00 pm












