मेढा नगरपंचायतच्या तत्कालीन मुख्याअधिकारी महेश गायकवाड यांच्या चौकशीचे प्रधान सचिव यांचे आदेश

पाचगणी : मेढा नगरपंचायतच्या तत्कालीन मुख्याअधिकारी महेश गायकवाड यांनी स्वच्छता अभियानात केलेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणी . नगर विकास विभागाकडे मुख्याअधिकारी यांची तक्रार करण्यात आली होती . तक्रारीची दखल घेत नगरविकास विभागाचे प्रधान  सचिव यांनी सातारा जिल्हा प्रशासन अधिकारी यांना सात दिवसात अहवाल पाठवण्याचे आदेश दिला आहे . 
    प्रधान सचिन नगर विकास विभाग यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की 

मेढा नगरपंचायतच्या स्वच्छता अभियानात स्वच्छतेच्या नावावर तीन महिन्याच्या भाडेतत्वावर हवेत तरगंत ठेवण्यात आलेल्या स्वच्छता फुग्याने मेढा नगरपंचायतमध्ये लुट केली असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. स्वच्छतेच्या जाहीरातीकरीता फुग्याच्या भाडचाकरीता लाखो रुपायाची उधळन केली आहे. मेढा नगरपंचायतच्या स्वच्छता अभियान २०१९ चा जनजागृती अभियानाचा ठेका जिओलॉन कपनीने घेतला होता. मेढा नगरपंचायतशी जिओलॉन कपनीने३१ आक्टोबर २०१८ ला करार केला होता याकरारात तीन महीन्याकरीता बलून पुरवणे स्वच्छ सर्वेक्षण असा स्पष्ट उल्लेख करार नाम्यात करण्यात आला आहे. मात्र या तीन महिन्याच्या स्वच्छता अभियान महाराष्ट्र अंतर्गत बलून तयार करुन योग्य त्या उंचीवर तयार करुन पुरवणे या नावाखाली फुग्याच देयक धक्कादायक ११३२८० रुपये देण्यात आले असून फुग्याच तीन महीन्यात भलीमोठी रक्कम आदा करण्यात आली असून निव्वळ भाडचाची किंमत देवुन मेढा नगरपंचायतच्या जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला आहे. मेढा नगरपंचायतध्ये स्वच्छता अभियानाअंतर्गत २०१९ मध्ये जनजागृतीमोहीमेत जनतेच्या पैशाचा अपव्यय करत भली मोठी साठमारी फुग्यामध्ये झाली असून कमी उत्पन्न. असलेल्या मेढा नगरपंचातमध्ये आरोग्य, वीज, याविषयीच भली मोठी कामे शहरासमोर उभी असताना नगरपंचायतचा खुले आम भष्ट्राचार महमंद तुघलगी कारभार जनतेच्या पैशाचा दुरुपयोग झाला आहे. याबाबात आपल्या स्तरावरून योग्य ती चौकशी होवुन तत्कालीन मुख्या अधिकारी नगरपंचायत मेढा यांनी संगनमताने खाजगी कपनीला दिलेल्या देयकांचे भ्रष्त्राचार केला आहे. त्यामुळे संबंधित मुख्याअधिकारी यांना निलंबित करुन भ्रष्वाचीर करणार्या अधिकार्यानवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला