साताऱ्यात पब्जी गेम खेळने पडले महागात. विवस्त्र फोटो व्हायरल ची धमकी देत तरुणीवर उत्तर प्रदेश येथील तरुणाचा अत्याचार.
Satara News Team
- Wed 6th Dec 2023 09:59 am
- बातमी शेयर करा

सातारा :पब्जी गेम खेळताना झालेल्या ओळखीचा फायदा घेत एका १९ वर्षीय तरुणीवर उत्तर प्रदेश येथील तरुणाने विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केला वारंवार अत्याचार. ही धक्कादायक घटना सातारा शहरात घडली असून, संबंधित तरुणावर सातारा शहर पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.पब्जी गेमच वेड लहान मुलांसह तरुण तरुणींना सूधा लागलं आहे. याचा फटका एका तरुणीला बसला आहे
उवैश नसीम अन्सारी (वय २४, रा. माैदाहा, ता. रागोल, जि. हमीदपूर, राज्य उत्तर प्रदेश), असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पब्जी गेम खेळताना संबंधित तरुणीची उवैश याच्याशी ओळख झाली. त्यानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये तो भेटण्यासाठी साताऱ्यात आला. त्यानंतर दोघेही अजिंक्यतारा किल्ला येथे गेले. त्याने तेथे तिचा विनयभंग केला. पुढे व्हॉट्सॲपवर सातत्याने विवस्त्र व्हिडीओ, फोटो देण्यासाठी तो धमकी देऊ लागला.
२१ फेब्रुवारी २०२३ रोजी पीडित तरुणीला भेटण्यासाठी पुन्हा तो अजिंक्यतारा किल्ला येथे आला. तेथे काढलेले फोटो व तरुणीने पाठवलेले विवस्त्र फोटो ‘तुझ्या आई-वडिलांना पाठवेन,’ अशी धमकी देऊ लागला. तसेच २२ फेब्रुवारीला साताऱ्यातील एका लॉजवर नेऊन त्याने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला व त्याचा व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग केला. ते रेकॉर्डिंग घरातील लोकांना पाठवेन, अशी धमकी देऊन पुन्हा २४ ऑगस्ट रोजी त्याच लाॅलवर नेऊन जबरदस्तीने अत्याचार केला.
हा प्रकार अखेर असह्य झाल्याने पीडित तरुणीने सातारा शहर पोलिस ठाण्यात सोमवार, दि. ४ रोजी रात्री अकरा वाजता गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक मोटे या अधिक तपास करीत आहेत.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Wed 6th Dec 2023 09:59 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Wed 6th Dec 2023 09:59 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Wed 6th Dec 2023 09:59 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Wed 6th Dec 2023 09:59 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Wed 6th Dec 2023 09:59 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Wed 6th Dec 2023 09:59 am
संबंधित बातम्या
-
वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.
- Wed 6th Dec 2023 09:59 am
-
गुरु द्रोणा अकॅडमी फलटण येथे विद्यार्थ्यास मारहाण.
- Wed 6th Dec 2023 09:59 am
-
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Wed 6th Dec 2023 09:59 am
-
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Wed 6th Dec 2023 09:59 am
-
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Wed 6th Dec 2023 09:59 am
-
वरकुटे-मलवडीत जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांचा छापा; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- Wed 6th Dec 2023 09:59 am
-
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Wed 6th Dec 2023 09:59 am
-
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Wed 6th Dec 2023 09:59 am