प्लास्टिक विक्री,वापर व कचरा उघड्यावर फेकणाऱ्या व्यक्तीवर होणार कारवाई
Satara News Team
- Fri 16th Feb 2024 01:42 pm
- बातमी शेयर करा
सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतमध्ये नागरिकांकडून प्लास्टिक वापर सर्रास केला जात असल्याने जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य टिकवण्यासाठी गाव व तालुकास्तरावरील पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात याव्यात अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. शंभूराजे देसाई यांनी दिल्या होत्या या अनुषंगाने सातारा तालुक्याची नियोजन बैठक पंचायत समिती येथे घेणेत आली. त्यावेळी गटविकास अधिकारी सतीश बुद्धे विस्तार अधिकारी पंचायत दळवी व काकडे गट संसाधन केंद्राचे कर्मचारी .गायकवाड,श्रीम बडदे,श्रीम.देशमुख उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाचा स्वच्छ भारत अभियान सातारा तालुक्यात सर्व ग्रामपंचायतमार्फत राबविण्यात येत आहे. सातारा तालुक्यात प्रत्येक गावात स्वच्छतेचे सातत्य राखणेसाठी उपक्रम राबविले जात आहेत. गावातील रस्ते जिल्हा, राज्य व राष्ट्रीय मार्गावर कचरा व प्लास्टिक टाकणारे लोकांवर व प्लास्टिक साठवणूक विक्री करणारे विक्रेते व वापर करणाऱ्या व्यक्तींवर करडी नजर ठेवून त्यांचेवर दंडात्मक कारवाही केली जाणार आहे अशी गटविकास अधिकारी बुद्धे यांनी माहिती दिली .
या मोहिमेसाठी प्रत्येक गावात एका पथकाची नेमणूक केली असून यामध्ये प्रत्येक गावात गावचे सरपंच ग्रामसेवक सामाजिक कार्यकर्ता ग्रा प सदस्य पोलीस पाटील असे पथक असेल तालुकास्तरावर एकूण 5 पथके तयार केली असून, या पथकामध्ये गटविकास अधिकारी सहा. गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी पंचायत असे सदस्य असतील.
या भरारी पथकाची मोहीम बुधवार दि १४ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. ही पथके प्लास्टिक विक्री साठवणूक करणाऱ्या विक्रेत्यांना पहिला गुन्हा ५००० दुसरा, गुन्हा १०००० व तिसरा गुन्हा केल्यास २५००० रु दंड आकारणार आहेत. तसेच उघड्यावर कचरा प्लास्टिक टाकणाऱ्या व्यक्तीना रु १२०० पासून पुढे दंड आकारणार आहेत या मोहिमेस कोणी अडसर/ अडथळा केला। तर त्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला जाणार आहे.
गावे स्वच्छ राखणेसाठी व प्लास्टिक बंदीसाठी गावात दवंडी, नोटीस बोर्ड, फ्लेक्स व गावातील सोशल मीडिया गृपवर प्रसिद्धी व जनजागृती केली जाणार आहे. गावात स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी गावांमध्ये उघड्यावरती कचरा फेकणाऱ्या लोकांची नावे पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत. व त्या व्यक्तींच्याकडून दंड वसूल करावा. पुढील एक महिन्याच्या कालावधीमध्ये ही मोहीम अधिक कडक करण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरावरील भरारी पथके ग्रामपंचायती, बाजाराची गावे,पर्यटन स्थळे येथे अचानक भेटी देणार आहेत. प्रत्येक गावातील रस्ते, चौक, गाव परिसर कचरामुक्त करण्यासाठी मोहीम स्वरूपात उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तालुका भरारी पथकात स्थानिक पोलिसांचा सहभाग असणार आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 16th Feb 2024 01:42 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 16th Feb 2024 01:42 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 16th Feb 2024 01:42 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 16th Feb 2024 01:42 pm
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 16th Feb 2024 01:42 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Fri 16th Feb 2024 01:42 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Fri 16th Feb 2024 01:42 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Fri 16th Feb 2024 01:42 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Fri 16th Feb 2024 01:42 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Fri 16th Feb 2024 01:42 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 16th Feb 2024 01:42 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 16th Feb 2024 01:42 pm












