वनपरिक्षेत्र वन्यजीव बामणोली मध्ये व्याघ्र दिनानिम्मित व्याघ्र दिंडी व रॅली चे नियोजन

बामणोली : आज दि 29.07.22 रोजी जागतिक व्याघ्र दिनानिम्मित वनपरिक्षेत्र वन्यजीव बामणोली येथे व्याघ्र दिंडी व रॅली चे नियोजन करण्यात आले होते , सदर उपक्रमास  वनपरिक्षेत्र वन्यजीव बामणोली चे कर्मचारी, भैरवनाथ बोट क्लब बामणोली चे सदस्य ,बामणोली ग्रामस्थ, तसेच 30 अंगणवाडी सेविकांची उपस्थिती होती. 
प्रथम स्व.मा.ग.गोगटे सभागृहामध्ये उपस्थितांना जागतिक व्याघ्र दिन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व स्थानिकांचेसाठी राबवण्यात येणारे उपक्रमांविषयी वनक्षेत्रपाल वजी बामणोली यांचेकडून मार्गदर्शन करण्यात आले, व बोट क्लब चे सदस्यांसाठी प्रशिक्षणाकरिता नावे कळवण्याचे आवाहन करण्यात आले. 
तदनंतर उपस्थित कर्मचारी व अंगणवाडी सेविकांसोबत व्याघ्र दिंडी काढण्यात आली व नंतर परिक्षेत्र कर्मचारी, बामणोली बोट क्लब सदस्य, ग्रामस्थ यांच्यासोबत व्याघ्र दिनाचे जागृतीसाठी रॅली काढण्यात आली

सदर उपक्रमास बामणोली येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहात उपक्रम पार पाडण्यास सहकार्य केले. सदर उपक्रम स.व्या.प्र. चे क्षेत्र संचालक मा. नानासाहेब लडकत, उपसंचालक मा. उत्तम सावंत, स.व.सं. मा. सुरेश साळुंखे व मा. सुभाष बागडी यांचे मार्गदर्शन व संकल्पनेतून संपन्न झाला

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला