सासूला का मारता? विचारल्याच्या कारणावरून एकावर कोयत्याने हल्ला

सातारा : “सासूला का मारहाण करता?”, अशी विचारणा केल्याच्या कारणावरून एकावर कोयत्याने वार करत हल्ला केल्याची घटना साताऱ्यातील खंडोबाचामाळ येथे घडली आहे. हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताचे अर्थे बोट अक्षरशः तुटले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नामदेव हणमंत खंडाळे(वय ४०, रा. राथिका रोड, परिसर सातारा) हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. तर मनोज आनंदा साठे (रा. खंडोबाचामाळ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथील खंडोबाचामाळ या ठिकाणी संशयिताने लाकडी दांडक्याने नामदेव खंडाळे यांच्या डोक्यात मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने वार केला. या मारहाणीत नामदेव खंडाळे यांच्या डाव्या हाताचे मधले बोट अर्थे तुटले. या घटनेनंतर नामदेव खंडाळे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. हवालदार मोहिते तपास करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला