साताऱ्यातील फळविक्रेत्याचे आर्थिक व्यवहारातून रत्नागिरी येथून अपहरण

साताऱ्यातील फळविक्रेत्याचे आर्थिक व्यवहारातून रत्नागिरी येथून अपहरण

रत्नागिरी : आर्थिक व्यवहाराच्या वादातून साताऱ्यातील फळविक्रेत्या तरुणाचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना रत्नागिरीतील टीआरपी परिसरात घडली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात इम्रान रौफ बागवान (३०, रा. निपाणी) व त्याचा मित्र अनिल (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) या दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपहरणाचा हा प्रकार साेमवारी (१३ मे) रात्री ११:०० ते ११:३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहरानजीकच्या टीआरपी येथील एका हॉटेलसमोरच घडला. याप्रकरणी जहीर शौकत बागवान (३०, रा. पिंपळेश्वर चौक, ता. जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. जहीर बागवान हे फळविक्रेते असून, रत्नागिरीतील अनेक फळ विक्रेत्यांना ते फळे देतात. व्यापाऱ्यांना दिलेल्या मालाचे पैसे घेण्यासाठी ते साेमवारी रत्नागिरीत आले हाेते. निपाणी येथील इम्रान बागवान हेही फळविक्रेते असून, ते जम्मू काश्मीर येथून फळांची खरेदी करून व्यापाऱ्यांना विकतात. त्यांच्याकडून जहीर बागवान यांनीही फळांची खरेदी केली हाेती. त्याचे ६० लाख रुपये ते देणे हाेते.

दरम्यान, साेमवारी रात्री ११:०० ते ११:३० वाजण्याच्या सुमारास जहीर व त्यांचा मित्र आतिक शेख हे दोघे कारमधून रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे जात होते. यावेळी टीआरपी येथील एका हॉटेलसमोर इम्रान रौफ बागवान याने आपली गाडी थांबविली. त्यानंतर इम्रान व त्याचा मित्र अनिल यांनी जहीर यांना त्यांच्या गाडीत बसवून निपाणी येथे नेले. त्यानंतर जहीर यांना कोंडून घालून बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर सोडून देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आपण घाबरल्याने तत्काळ पोलिस स्थानकात तक्रार दिली नाही, असे जहीर बागवान यांनी पाेलिसांना सांगितले. मात्र, त्यांनी शुक्रवारी (१७ मे) रात्री उशिरा रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात याबाबत फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या अपहरणप्रकरणी पाेलिसांनी अद्याप काेणालाही अटक केलेली नाही. अधिक तपास सहायक पाेलिस निरीक्षक विलास जाधव करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला