सातारा- जावली मतदारसंघातील ४ रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी २० कोटी

आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मिळाला निधी

सातारा : सातारा जावली मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणून प्रत्येक गाव आणि वाडीवस्ती विकासाच्या प्रवाहात आणणाऱ्या आ.श्रीमंत. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून मतदारसंघातील चार रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी २० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.  आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री ग्राम  सडक योजनेतून हा निधी मंजूर  करून घेतला आहे.
        सातारा तालुक्यातील राज्य मार्ग क्रमांक १४० ते  जकातवाडी  ते करंडी  रस्त्याची ( १.९५० कि.मी.) दर्जोन्नती करण्यसाठी १ कोटी ६१ लाख १५ हजार  रुपये, प्रमुख जिल्हा मार्ग २९ ते सांडवली रस्त्याची (९.२००  कि.मी.)  दर्जोन्नती करण्यसाठी ८  कोटी ७४ लाख  ८७  हजार  रुपये, तर प्रमुख जिल्हा मार्ग २९ ते वरची जगमीन रस्त्याची ( ६.२०० कि.मी.) दर्जोन्नती करण्या साठी ५ कोटी ७५ लाख ७५ हजार  रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
        जावली तालुक्यातील  प्रमुख जिल्हा मार्ग  १४१ म्हाते बु. ते भामघर ते भोगवली ते आसणी (गाडी तळ) रस्त्याची  ( ५.०७५ कि.मी.) दर्जोन्नती करण्यासाठी ३ कोटी ९१ लाख २७  हजार  रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर कामांची निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार त्वरित पूर्ण करून कामे सुरु करा आणि कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बाधंकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला