अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्यास मारहान केलेल्या नराधमाच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या
Satara News Team
- Mon 16th Jun 2025 01:11 pm
- बातमी शेयर करा
लोणंद : लोणंद पोलीस ठाणे हददीत गुरुवारी लोणंद येथील आयटीआय कॉलेज मधुन घरी जिंती ता.फलटण येथे जात असताना अल्पवयीन मुलाचे काळज ता. फलटण जि.सातारा येथे स्पीड ब्रेकर जवळ सायंकाळी ५.३० वाजता अज्ञात पाच इसमांनी अपहरण करुन त्यास घेवुन गेले होते .त्यानुसार प्रभारी अधिकारी सुशिल भोसले, सहायक पोलीस निरीक्षक यांनी सपोफौ. पिसाळ, पोहवा नाळे, पोना. मदने, पोकाँ. काळे, पोकाँ. कोळेकर पोकाँ. जाधव, पोकाँ. नामदास यांचेसह काळज येथे जावुन तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहून अपहरण झालेल्या मुलाच्या वडीलांना बोलावुन घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली त्यावेळी त्यांचेकडुन समजले की, पाठीमागे काही दिवसांपुर्वी एका कार्यक्रमा दरम्यान अपहरण झालेल्या मुलासोबत साखरवाडी येथील काही मुलांचा वाद झाला होता. त्यावेळी त्या मुलांनी त्यास उचलुन नेण्याची धमकी दिली होती.
त्यावरुन अपहरण झालेल्या मुलाच्या वडीलांनी लोणंद पोलीस स्टेशनला जुन्या भांडणाचा रागातून मुलाचे अपहरण करुन वाईट हेतुने पळवुन नेलेबाबत गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो. डॉ. वैशाली कडुकर ,मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई अति कार्यभार फलटण विभाग श्री. बी. वाय. भालचिम सो, यांनी लोणंद पोलीस स्टेशन कडील गुन्हे प्रकटीकरण पथकास अल्पवयीन मुलाचा व आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या . शोध सुरु असताना अल्पवयीन मुलास दिनांक १२/०६/२०२५ रोजी सायंकाळी ५.०० ते ५.३० वाजणेचे सुमारास आरोपींनी दोन मोटार सायकलवरुन येवुन काळज ता. फलटण गावचे हद्दीतुन तडवळे ता. फलटण जाणारे रोडने घेवुन पसार झाले होते. त्यानंतर काळज येथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन पुढे तडवळे रोडने खराडेवाडी, साखरवाडी रोडने होळ ता. फलटण येथुन होळ ता. बारामती येथे नेल्याची व त्यास मारहान केली असल्याची लोकांचेकडुन माहीती पोलिसांना मिळाली. त्यावरून साखरवाडी, होळ, बजरंगवाडी, लाटे, को-हाळे बु. को-हाळे खुर्द ता. बारामती या ठिकाणी पाहणी करुन होळ,बजरंगवाडी ता बारामती येथील सीसीटीव्ही फुटेजची पाहिले त्यावेळी बजरंगवाडी ता. बारामती येथील फुटेज पाहात असताना दोन्ही मोटार सायकलवरुन फक्त पाच इसम दिसले त्यावरुन पोलिसांची खात्री झाली की आरोपींनी पोलीस पाठलागावर असल्याचा संशय आल्याने अल्पवयीन मुलांस खुंटे ते जिंती ता. फलटण रोडवर परीसरात सोडुन तेथुन पोबारा करुन पळुन गेले आहेत अशी माहीती मिळताच अपहरण झालेल्या मुलाच्या वडीलांनी याठिकाणी जावुन पाहीले त्यावेळी मुलगा बेशुध्द अवस्थेत होता म्हणुन त्यास उपजिल्हा रुग्नालय फलटण व त्यानंतर बारामती येथील एका हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी घेवुन गेले आहेत.
अल्पवयीन मुलगा घाबरलेल्या स्थितीत होता त्यास आरोपींनी घटनेबाबत जर कोणास काही एक सांगीतले तर तुला व तुझ्या घरातील लोकांना जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्याने घाबरुन दोन दिवस काही एक सांगीतले नाही. दरम्यान कालावधीत मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मा.अप्पर पोलीस अधीक्षक साो. डॉ. वैशाली कडुकर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई अति. कार्यभार फलटण विभाग श्री. बी. वाय. भालचिम सो, यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी लोणंद पोलीसस्टेशन कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना मार्गदर्शन करुन आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या. सदर सर्व पथकांने गोपणिय माहीतीचे आधारे अतोनात प्रयत्न करुन गुन्हयातील चार आरोपी ताब्यात घेतले आहेत.
दिनांक १५/०६/२०२४ रोजी वरिष्ठांचे मार्गदर्शनावरुन सदर आरोपीस लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. सुशिल भोसले, सहाय्यक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घुले, अंमलदार पोना. बापुराव मदने, विठ्ठल काळे, अंकुश कोळेकर, अमोल जाधव यांनी साफळा रचुन दोन आरोपींना पुणे ग्रामीण पोलीसांचे मदतीने ताब्यात घेतले व दोन आरोपींना आंबवडे ता. कोरेगाव जि. सातारा येथून ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीस न्यायालयात भेटवुन अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घुले हे करीत आहेत. सदर गुन्हयाचा तपास मा.पोलीस अधीक्षक साो सातारा तुषार दोशी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो. डॉ. वैशाली कडुकर , मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई अति कार्यभार फलटण विभाग श्री.बी. वाय. भालचिम सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घुले हे करीत असुन सदर कारवाईमध्ये लोणंद पोलीस स्टेशनचे श्री. सुशिल भोसले, सहाय्यक पोलीस निरिक्षक, श्री. शिवाजी घुले पोलीस उपनिरीक्षक, ज्योती चव्हाण म.पोलीस उपनिरीक्षक, सपोफौ. विजय पिसाळ, सपोफौ. दिलीप येळे, पोहवा. संतोष नाळे, पोहवा नितीन भोसले व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पो.ना.बापुराव मदने, विठ्ठल काळे, अंकुश कोळेकर, अमोल जाधव, सुनिल नामदास, शेखर शिंगाडे, चालक जयवंत यादव, जमीर मुलाणी यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असुन मा. पोलीस अधिक्षक सो सातारा यांनी विषेश अभिनंदन केले आहे.
आरोपींची नावे :-
(१) राकेश ऊर्फ मोन्या रमेश जाधव वय २९ वर्षे रा. सातसर्कल साखरवाडी ता. फलटण
(२) अशुतोष ऊर्फ बटया संतोष जाधव वय २१ वर्षे रा. सातसर्कल साखरवाडी ता. फलटण
(३) प्रविण किसन मोहिते वय २७ वर्षे रा. रा. साखरवाडी ता. फलटण
(४) सिध्दांत यशवंत बनसोडे वय १९ वर्षे रा. साखरवाडी ता. फलटण जि.सातारा.
(५) अजय शशिकांत सपकाळ रा. साखरवाडी ता. फलटण ( फरारी)
@crimelonand
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 16th Jun 2025 01:11 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 16th Jun 2025 01:11 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Mon 16th Jun 2025 01:11 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 16th Jun 2025 01:11 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Mon 16th Jun 2025 01:11 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Mon 16th Jun 2025 01:11 pm
संबंधित बातम्या
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Mon 16th Jun 2025 01:11 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Mon 16th Jun 2025 01:11 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Mon 16th Jun 2025 01:11 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Mon 16th Jun 2025 01:11 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Mon 16th Jun 2025 01:11 pm
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Mon 16th Jun 2025 01:11 pm
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Mon 16th Jun 2025 01:11 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Mon 16th Jun 2025 01:11 pm












