काशीळ येथे एका शेतात सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर चक्क १७ लाख ८३ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत
Satara News Team
- Sun 3rd Mar 2024 02:35 pm
- बातमी शेयर करा
सातारा ; काशीळ, ता. सातारा येथे एका शेतात सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी छापा टाकून २७ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोकड, जुगाराचे साहित्य आणि मोबाइल, वाहने, असा सुमारे १७ लाख ८३ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई शनिवारी रात्री आठ वाजता बोरगाव पोलिसांनी केली.
लक्ष्मण मारुती यादव, वैभव विजय साळुंखे, समीर सर्जेराव भोसले, मारुती सीताराम दरवडे, दत्ता सुदाम सोनवणे, सुरेश बाळकृष्ण रोमण, विलास नानासाहेब राजेमहाडिक, गुड्डू रावत कुमार, सदानंद नारायण देवाडिगा, रोहित रामचंद्र घाडगे, शहाबुद्दीन अकबरमिया, संदीप श्रीपती गुंजले, डालू जितू पंडित, विकास भानुदास पवार, किशोर पांडुरंग बारटक्के, जयवंत रामचंद्र जाधव, दत्तात्रय शिवाजी वायदंडे, समीर साहेब पठाण, अशोक हनुमंत मोहिते, विशाल जालिंदर नरसाळे, युवराज दिलीप माने, श्रीकांत इंद्रदेव प्रसाद, रोहित मानसिंग घाडगे, अझरुद्दीन अब्दुल शेख, मोहन बाबासो शिंदे, अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काशीळ, ता. सातारा येथील ‘अतिथी’ नावाच्या हाॅटेलच्या पाठीमागील शेतात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी रात्री आठ वाजता चार पथके घेऊन तेथे पोलिसांनी अचानक छापा टाकला. त्यावेळी पोलिस आल्याचे पाहून काही जुगारी पळून गेले तर इतर २७ जण जुगार खेळताना पोलिसांना रंगेहाथ सापडले. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी जुगाराचे साहित्य, रोकड, मोबाइल, वाहने, असा सुमारे १७ लाख ८३ हजारांचा ऐवज जप्त केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने काशीळ परिसरात खळबळ उडाली. या घटनेची बोरगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार सपकाळ हे अधिक तपास करीत आहेत.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 3rd Mar 2024 02:35 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 3rd Mar 2024 02:35 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 3rd Mar 2024 02:35 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 3rd Mar 2024 02:35 pm
संबंधित बातम्या
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Sun 3rd Mar 2024 02:35 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 3rd Mar 2024 02:35 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Sun 3rd Mar 2024 02:35 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Sun 3rd Mar 2024 02:35 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Sun 3rd Mar 2024 02:35 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Sun 3rd Mar 2024 02:35 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Sun 3rd Mar 2024 02:35 pm












