म्हसवड पोलिसांचा वाळू माफियांना पुन्हा एकदा दणका..

पिकअप टेम्पो वाळूसह ताब्यात घेऊन आरोपीस केले अटक ; ५ लाख ५० हजार रु. मुद्देमाल जप्त...

आंधळी, दि. ७  : म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व सहकारी यांचा पुन्हा एकदा अवैद्य धंद्यावर धडक कारवाई करत वाळू माफियांना दणका दिला असून अवैद्य वाळू उपसा व वाळू वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पोसह आरोपीला अटक करून ५ लाख ५० हजार रुपयेच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

या कारवाई मूळे अवैद्य वाळू उपसा करणारे व वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत म्हसवड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, म्हसवड हद्दीतून मानगंगा नदीच्या पात्रातून एक पांढऱ्या रंगाच्या पिकअप टेम्पो वाळू भरून वाहतूक करीत असल्याबाबतची बातमी मिळाली त्यानंतर परिसरात शोध घेत असताना म्हसवड ते माने वस्ती जाणाऱ्या रोडवर मल्हारनगर येथील समाज मंदिरा शेजारी पाठलाग करून त्यास पकडले असता आरोपी कुलदीप संपत माने रा. मानेवस्ती (म्हसवड) यास ताब्यात घेऊन त्याच्यावर महसवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 सदरची कामगिरी ही वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पो. हवा. अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे यांनी केली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला