काँग्रेसच्या भ्रष्ट खासदादाराला साताऱ्यात मारले जोडे, पुतळा जाळला भा ज पा चे साताऱ्यात निषेध आंदोलन
Satara News Team
- Mon 11th Dec 2023 02:25 pm
- बातमी शेयर करा
सातारा : काँग्रेसचे राज्यसभा खासदार श्री धीरज प्रसाद साहू यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा घातल्यावर नोटा मोजण्याची मशिन्स मागवावी लागली या वरूनच काँगेस चा भ्रष्टाचार सर्वसामान्य भारतीयांना समजला आहे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या सूचनेनुसार साताऱ्यात भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वात पोवई नाका येथे निषेध आंदोलन करण्यात आले, काँग्रेसच्या भ्रष्ट खासदादाराच्या फोटो ला जोडे मारले आणि प्रतिकात्मक पुतळा जळण्यात आला, सातारा जिल्ह्यात सातारा, कराड, वाई, फलटण आणि कोरेगाव येथे आंदोलन करण्यात आले
जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितले कीं ६ डिसेंबर २०२३ रोजी आयकर विभागाने मद्य निर्मिती कंपनी बलदेव साहू आणि समूहाच्या झारखंड आणि ओडिशामधील 10 ठिकाणी छापे टाकले. आयकर विभागाने बोलंगीर कार्यालयापासून ३० किमी अंतरावर असलेल्या बलदेव साहू कंपनीच्या सातपुडा कार्यालयावर छापा टाकून २०० कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.
धैर्यशील कदम पुढे म्हणाले काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू आणि मद्यनिर्मिती कंपनी बलदेव साहू आणि समूहाशी संबंधित उद्योगपती यांच्या निवासस्थानावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. आयकर विभागाची ही कारवाई सुमारे ३ दिवस चालली,बुधवारी सुंदरगढ़ शहरातील सरगीपाली येथील काही घरे, कार्यालये आणि डिस्टिलरीवर येथे धाडी टाकण्यात आल्या,त्यातून ही रोकड विभागाने जमा केली आहे. त्यातून इतकी जास्त रक्कम आयकर विभागाच्या हाती लागली की त्यांना मुद्दाम नोटा मोजणारी चाळीस पेक्षा जास्त मशिन्स मागवून घ्यावी लागली आणि १५७ मोठ्या बॅगांमधून ही रक्कम आयकर विभागाला न्यावी लागली.
जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले अनेक बेकायशीर व्यवसाय असलेले धीरज प्रसाद साहू काँग्रेसचे राज्यसभेचे ३ वेळचे खासदार राहिलेले आहेत. शिवाय त्यांचा दारू विक्री आणि गाळण्याचा सुद्धा व्यवसाय आहे.
ज्या ठिकाणी कॉंग्रेसची सरकारे असतात तिथे तिथे असे नेते काँग्रेस सरकारच्या माध्यमातून राज्याची, जनतेची लूट करतात. हा काँग्रेसचा गुणधर्मच आहे. याचा पुरावा आपल्याला नुकत्याच झालेल्या राज्यांच्या निवडणुकीत मिळाला आहे, काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराला आणि मनमानी कारभाराला कंटाळून जनतेने भाजप सरकारला निवडून दिलं. आता झारखंड मधील या २०० कोटीच्या प्रकरणांमुळे काँग्रेस बिलकुलच सुधारली नाहीये हे दिसून येतंय. राज्यसभेची खासदारकी ही राजकारणाच्या पलीकडे सुद्धा माणसाची गुणवत्ता पाहून दिली जाते. पण दारूच्या व्यवसायात असणाऱ्या आणि ज्याच्या अनेक बेकायदेशील व्यवसायांमधून अमाप संपत्ती कमावणाऱ्या व्यक्तीला काँग्रेसने राज्यसभेची खासदारी का दिलेली असेल, याचा विचार भारताच्या जनतेने करावा. काँग्रेसने कायम अशा भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घातलेलं आहे
महाराष्ट्रात सुद्धा जनतेने भाजपशासित प्रशासन पाहिलं होतं, पण जनतेने दिलेला कौल घुडकावून लावून स्वार्थासाठी एकत्र आलेल्या लोकांचा अडीच वर्षाचा कारभार सुद्धा अनुभवला आहे . ते अनैतिक सरकार उलथवून टाकून जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी भा ज पा ला मिळाली आहे.
ज्या पद्धतीने UPA सरकार १० वर्षे राज्य करत होते. तेच काँग्रेसचे अजूनही सुरु आहे. UPA च्या अनेक भ्रष्टाचारांची उदाहरणे असल्यामुळे लाज वाटून काँग्रेसने त्यांच्या आघाडीचे नाव बदलले. काँग्रेस सरकारचा कोळसा घोटाळा, टू जी घोटाळा, कॉमनवेल्थ गेम्समध्ये केलेला प्रचंड भ्रष्टाचार भारताची जनता विसरलेली नाही. इथे महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा महाराष्ट्राचा गृह मंत्री १०० कोटी हप्ते मागत फिरत होता. त्या हप्त्यांसाठी सरकारी यंत्रणांचा वापर करत होता. हीच कौग्रेसच्या राजकारणाची पद्धत राहिलेली आहे.देशाला लुबाडणारा काँग्रेसचा 'हात' आहे आणि देशात विकासाची भरभराट करणारं भाजपचं कमळ आहे. देश स्वतःची वैयक्तिक ATM असल्यासारखा या कॉंग्रेसच्या नेत्यांनी लुटला आहे. आणि आता भारताच्या जनतेला या दोन सरकारांमधला फरक लक्षात आलेला आहे. आणि 'ना खाऊंगा ना खाने दूंगा' या मोदींच्या शब्दावर विश्वास ठेवून नुकतेच ३ राज्यांत जनतेने काँग्रेसला नाकारत भाजपला प्रचंड बहुमत दिले. याच मुख्य कारण हेच आहे की जनता काँग्रेसच्या या मनमानी, अकार्यक्षम, भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळली आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्यांना मोदींच्या गॅरंटीवर विश्वास आहे. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची गॅरंटी असते आणि जिथे भाजपची सत्ता असते तिथे विकासाची म्हणजेच मोदींची गॅरंटी असते हे सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा माहित झाले आहे असेही धैर्यशील कदम यांनी सांगितले
या वेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रदेश उपाध्यक्ष भटके विमुक्त आघाडी एड. दीपक पाटील, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी , सातारा तालुका पश्चिम अध्यक्ष महेश गाडे, जावली तालुका अध्यक्ष श्रीहरी गोळे, रहिमतपूर तालुका अध्यक्ष भीमराव पाटील, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, चित्रलेखा माने-कदम, प्रदेश चिटणीस महिला मोर्चा सुनीशा शहा,प्रदेश चिटणीस अनु.जाती मोर्चा एड.शैलेंद्र कांबळे, जिल्हाध्यक्ष भटके विमुक्त आघाडी विलास आटोळे, जिल्हाध्यक्ष सोशल मिडिया सेल रवींद्र लाहोटी, जिल्हाध्यक्ष अनु.जाती मोर्चा अमित भिसे, जिल्हाउपाध्यक्ष धनंजय जांभळे, रणजीत फाळके, राहुल शिवनामे, मनीष महाडवाले, डॉ. सचिन साळुंखे, डॉ. सचिन भोसले, जिल्हाचिटणीस अर्चनाताई देशमुख, रीना भणगे, वैशालीताई टांकसाळे, कुंजा खंदारे, अनिता बोडस, निशा जाधव, वनिता पवार, कविता जाधव, प्रिया नाईक, राधाबाई गायकवाड, निर्मला पाटील, अविनाश खर्शीकर, अमोल टंकसाळे, संदीप ननावरे, प्रवीण शहाणे, गणेश जाधव, रवींद्र आपटे, विक्रम बोराटे, राज सोनावले, बाळू मोरे, संगीता जाधव, अमोल कांबळे, विकास राऊत, अनंत साबळे, सुनील कांबळे, प्रतीक पवार, राहुल जाधव, संजय आटोळे, नेताजी घाडगे, रामराव घाडगे, राजू चव्हाण, कृणाल मोरे, जयराज मोरे, संदीप कदम, चैतन्य बोडस, किरण भिलारे,रोहिदास नवसरे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 11th Dec 2023 02:25 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 11th Dec 2023 02:25 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 11th Dec 2023 02:25 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 11th Dec 2023 02:25 pm
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 11th Dec 2023 02:25 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Mon 11th Dec 2023 02:25 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Mon 11th Dec 2023 02:25 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Mon 11th Dec 2023 02:25 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Mon 11th Dec 2023 02:25 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Mon 11th Dec 2023 02:25 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 11th Dec 2023 02:25 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 11th Dec 2023 02:25 pm












