मटकावाला समीर देतोय कायदेवाल्या समीर शेखांना चॅलेंज
लिंब, नागेवाडीत मटका जोमात; मटका किंगच साम्राज्य आता खेडोपाड्यात पसरलेSatara News Team
- Fri 16th May 2025 05:34 pm
- बातमी शेयर करा

सातारा : सातारा जिल्ह्यात डीवायएसपी म्हणून जोमाने काम करत गुन्हेगारांसह अवैध धंदेवाल्यांच्या मनात धडकी भरवणाऱ्या समीर शेख यांनी सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तोच धाक तोच दरारा परत पाहायला मिळेल अशी सर्वसामान्य नागरिकांना आशा असताना सध्या मात्र सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध धंदे जोमाने सुरु आहेत. त्यातच पोलीस अधीक्षक समीर शेख यांना चक्क दुसऱ्या समीरने ओपन चॅलेंज दिल्याचे पाहायला मिळत आहे. मटका किंग म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या समीर कच्छी याने शहरांसह आता खेडोपाड्यात देखील आपले अवैध बस्तान बसवायला सुरुवात केली आहे. सातारा तालुका पोलिसांच्या हद्दीत आणि महामार्गालगत असलेल्या लिंब आणि नागेवाडी या गावांत आता समीर कच्छीच्या आशीर्वादाने त्याचे चेले मटका व्यवसाय खुलेआम चालवत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सातारा जिल्ह्यात शहरी भागात मटका, चक्री, जुगार, वेश्या व्यवसाय, दारू विक्री, गुटखा विक्री यासह अनके अवैध व्यवसाय जोमाने सुरु असताना याचे लोन ग्रामीण भागात देखील पसरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्याची तरुणाई या अवैध धंद्याची शिकार होत व्यसनाधीनतेकडे वळत आहे. यावैध धंद्यांवर पोलीस देखील कारवाई न करता केवळ हप्ता मिळतोय म्हणून दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अवैध धंद्यांची पाळेमुळे अजून खोल रुजली आहेत. मटका किंग समीर कच्छी याने हीच संधी साधत पोलिसांनाच खिशात घालत खेडोपाड्यात बस्तान बसविले आहेत. तसे मटका किंग समीर कच्छीचे साम्रज्य हे फक्त जिल्ह्याबाहेच नाहीतर राज्याबाहेर देखील पसरले आहे. याची प्रचिती २०२३ मध्ये आली होती. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी २०२३ मध्ये समीर कच्छीसह ४२ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करत राज्यातील सर्वांत मोठी कारवाई केली होती. परंतु यातून बाहेर येत समीर कच्छीने पुन्हा ऊतमात सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वी एकावर हल्ला केल्याच्या आरोपात समीरला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले होते, यावेळी पोलिसांच्या ताब्यात असताना देखील पोलिसांच्या संमतीनेच समीरला घरून बिर्याणीचा डबा पुरविण्यात आल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे कर्तव्यदक्ष पोलिसांनी याआधी केलेल्या कारवाईला न जुमानता केवळ हप्तेखाऊ पोलिसांच्या कृपाशीर्वादाने आपण जणू सातारा पोलिसांचा जावईच असल्याच्या अविर्भात असलेल्या समीर कच्छीने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनाच चॅलेंज दिले आहे.
त्यामुळे, कितीही गुन्हे दाखल झाले तरी समीर कच्छी उर्फ शेठ उर्फ टकल्या हा पोलिसांना घाबरत नसल्याचेच समोर येत आहे. एक गुन्हा दाखल झाला की हा दुसरा गुन्हा करण्यास तयार होतो. कारण कलमेच त्या पद्धतीची त्याच्यावर लावण्यात येतात. जेणेकरुन तो मोठ्या कचाट्यात सापडायला नको. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा कोणताच अंकुश राहिलेला नाही. काहीच शेरदिल अधिकारी त्याच्या बखोटीला धरुन त्याला पोलिसी हिसका दाखवतात. मात्र ते काहीच. तसे पहायला गेले तर मटका किंग समीर कच्छी ने आपल्या अवैध धंद्यांच्या साम्राज्याचा विस्तार सातारा जिल्ह्यासह परजिल्ह्यातही केला आहे. हे त्याचा सीडीआर काढला तर कोणाच्याही लक्षात येईल. पण इतक्या खोलात जाण्यासाठी पोलिसांच्या तशा मानसिकतेची गरज आहे. पण सातारा शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखायची असेल तर समीर कच्छीसह त्याच्या साथीदारांला पुन्हा एकदा मोक्का दाखवण्याची नितांत गरज असल्याचेच दिसून येते.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Fri 16th May 2025 05:34 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Fri 16th May 2025 05:34 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Fri 16th May 2025 05:34 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Fri 16th May 2025 05:34 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Fri 16th May 2025 05:34 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Fri 16th May 2025 05:34 pm
संबंधित बातम्या
-
वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.
- Fri 16th May 2025 05:34 pm
-
गुरु द्रोणा अकॅडमी फलटण येथे विद्यार्थ्यास मारहाण.
- Fri 16th May 2025 05:34 pm
-
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Fri 16th May 2025 05:34 pm
-
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Fri 16th May 2025 05:34 pm
-
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Fri 16th May 2025 05:34 pm
-
वरकुटे-मलवडीत जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांचा छापा; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- Fri 16th May 2025 05:34 pm
-
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Fri 16th May 2025 05:34 pm
-
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Fri 16th May 2025 05:34 pm