साताऱ्यात कोरोनाचा संसर्ग वेग पकडू लागला
Satara News Team
- Thu 7th Jul 2022 05:34 am
- बातमी शेयर करा
कोरोनाबाधित सापडत असले, तरी नागरिकांच्या शरीराला या विषाणूची ओळख झाल्याने रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचेही कारण नाही. परंतु, प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी आवश्यक उपाययोजनांसाठी तातडीने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
सातारा : गेल्या काही दिवसांपासून कमी व संथगतीने असलेला कोरोनाचा संसर्ग वेग पकडू लागला आहे. जिल्ह्यात काल ५३ तर, आज ६९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका ओळखून नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे.
अडीच वर्षांपूर्वी जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा वेगाने प्रसार झाला. दररोज हजारोंच्या संख्येने बाधित सापडले. मृतांची संख्याही हजारोंच्या घरात गेली. त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी प्रशासन दिवस-रात्र झटत होते. नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील वावरावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे अनेकांची आर्थिक कोंडीही झाली. गेल्या सहा महिन्यांत कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत गेले. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली. नागरिकांवरील निर्बंधही हटले आहेत. मात्र, निर्बंध हटले तरी, कोरोना अजूनही संपला नाही, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करा, असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत होते.
उपाययोजनांसाठी तातडीने पुढाकार घ्या
कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, गर्दीत जाणे टाळावे, एकमेकांत अंतर ठेवावे, तोंड, नाक, कान, डोळ्याला हात लावण्यापूर्वी साबणाने अथवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत. केवळ या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाबाधित सापडत असले, तरी नागरिकांच्या शरीराला या विषाणूची ओळख झाल्याने रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचेही कारण नाही. परंतु, प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी आवश्यक उपाययोजनांसाठी तातडीने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
coprona
Satara
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 7th Jul 2022 05:34 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 7th Jul 2022 05:34 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 7th Jul 2022 05:34 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Thu 7th Jul 2022 05:34 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Thu 7th Jul 2022 05:34 am
संबंधित बातम्या
-
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Thu 7th Jul 2022 05:34 am
-
आखेर सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण स्पष्ट, एक व्हेंटिलेटरवर
- Thu 7th Jul 2022 05:34 am
-
कोजागिरीचे मसालादुध कसे तयार करावे ?
- Thu 7th Jul 2022 05:34 am
-
सातारा शहरामध्ये तापाचे रुग्णाच्या संख्येत वाढ.दवाखाने हाऊसफुल्ल
- Thu 7th Jul 2022 05:34 am
-
महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी गावात हॉटेलला लागली मोठी आग
- Thu 7th Jul 2022 05:34 am
-
महाबळेश्वर तालुक्यातील आढाळ या गावाची उपसरपंच संजीवनी विठ्ठल ढेबे यांचा ह्रदयविकाराने मृत्यू.
- Thu 7th Jul 2022 05:34 am
-
पुण्यात ‘झिका’चा आणखी एक रुग्ण सापडला, एकूण रुग्णसंख्या चार.
- Thu 7th Jul 2022 05:34 am
-
आठ तालुक्यात पाच हजार ९५१ नागरिकांच्या रक्तातून ‘हत्तीरोगा’चे निदान!
- Thu 7th Jul 2022 05:34 am













