वजन कमी करण्यासाठी रामबाण ठरतात हे 5 हर्बल टी
Satara News Team
- Sun 13th Aug 2023 10:59 am
- बातमी शेयर करा

सातारा न्यूज आरोग्य टिप्स : वाढतं वजन हे प्रत्येकासाठी डोकेदुखी ठरतं. त्यामुळे बरेच जण वजन कमी करण्यासाठी सहसा व्यायामाचा किंवा आहारातील बदलाचा विचार करतात. मात्र, या दोन्ही गोष्टींसाठी वेळ आणि परिश्रमाची गरज असते. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे व्यायामाला वेळ देणं प्रत्येकाला शक्य होत नाही. अशा परिस्थितीत हर्बल टी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. कारण हर्बल टी बनवायला सोपा असून त्याला वेळही कमी लागतो. तसेच तो सामान्य चहा सारखाच प्यायला जातो आणि वजन झपाट्याने कमी करण्यासही मदत होते. चला तर मग जाणून घेऊया काही हर्बल टी बनवण्याची पद्धत.
हळदीचा चहा ( Turmeric tea )
शरीरावरची चरबी जाळण्यासाठी हळदी चहा प्रभावी ठरतो. हा चहा बनवण्यासाठी एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्या. त्यात थोडी हळद आणि आले टाकून उकळावे. अशा प्रकारे तुमचा हळदीचा हर्बल चहा तयार आहे. या चहामुळे चयापचय आणि पचन सुधारण्यास मदत होत वजनही कमी होते.
तुळशी चहा (Tulsi Tea)
तुळशीचा चहा शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकतो. हा चहा प्यायल्यानंतर चयापचय चांगले होते. ज्यामुळे शरीरातील जास्तीत जास्त कॅलरीज बर्न होतात. यासह पचनक्रिया सुधारते. तुळशीची पाने पाण्यात उकळून त्यात अर्धा चमचा मध टाकून तुम्ही हा चहा बनवू शकता.
ओव्याचा चहा ( Ajwain Tea)
ओव्याचा चहा वजन कमी करण्यासह पोटासाठीही फायद्याचा ठरतो. हा चहा बनवण्यासाठी अर्धे आले बारीक करून पाण्यात उकळा. त्यात एक चमचा ओव्याचे दाणे मिसळा. पाणी उकळल्यानंतर ते गाळून त्यात अर्धा लिंबू पिळावा. या प्रकारे तुमचा हर्बल चहा तयार आहे.
ब्लॅक टी (Black tea)
ब्लॅक टी हा दुधाशिवाय बनवला जाते. यामुळे कमी कॅलरीज मिळत चरबी कमी होण्यास मदत होते. या चहाचे नियमित सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
ग्रीन टी (Green tea)
वाढते वजन कमी करण्यासाठी अनेक जण सहसा ग्रीन टीला प्राधान्य देतात. ग्रीन टी बाजारात सहज उपलब्ध तसेच बनवण्यास सोपा आहे. ग्रीन टी बॅग्ज गरम पाण्यात काही वेळ ठेवल्यानंतरच ग्रीन टी तयार होतो. ग्रीन टीमुळे शरिरातून टाकाऊ घटक बाहेर पडतात. या चहाच्या नियमित सेवनाने पोटाची चरबी कमी होत त्याचा परिणाम वजनावर दिसून येतो. वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज 2 कप ग्रीन टी पिऊ शकतात.
#Weightloss
#WeightlossTips
#Blacktea
#Greentea
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Sun 13th Aug 2023 10:59 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Sun 13th Aug 2023 10:59 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Sun 13th Aug 2023 10:59 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Sun 13th Aug 2023 10:59 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Sun 13th Aug 2023 10:59 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Sun 13th Aug 2023 10:59 am
संबंधित बातम्या
-
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Sun 13th Aug 2023 10:59 am
-
आखेर सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण स्पष्ट, एक व्हेंटिलेटरवर
- Sun 13th Aug 2023 10:59 am
-
कोजागिरीचे मसालादुध कसे तयार करावे ?
- Sun 13th Aug 2023 10:59 am
-
सातारा शहरामध्ये तापाचे रुग्णाच्या संख्येत वाढ.दवाखाने हाऊसफुल्ल
- Sun 13th Aug 2023 10:59 am
-
महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी गावात हॉटेलला लागली मोठी आग
- Sun 13th Aug 2023 10:59 am
-
महाबळेश्वर तालुक्यातील आढाळ या गावाची उपसरपंच संजीवनी विठ्ठल ढेबे यांचा ह्रदयविकाराने मृत्यू.
- Sun 13th Aug 2023 10:59 am
-
पुण्यात ‘झिका’चा आणखी एक रुग्ण सापडला, एकूण रुग्णसंख्या चार.
- Sun 13th Aug 2023 10:59 am
-
आठ तालुक्यात पाच हजार ९५१ नागरिकांच्या रक्तातून ‘हत्तीरोगा’चे निदान!
- Sun 13th Aug 2023 10:59 am