आप्पा मांढरे गोळीबार प्रकरण; दोघा अल्पवयीन मुलांसोबत एकजण पाच तासांत ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद.Satara News Team
- Thu 10th Nov 2022 12:14 pm
- बातमी शेयर करा

सातारा ; दि.०९/११/२०२२ रोजी रात्री २०.३० वा. च्या सुमारास फिर्यादी दिपक उर्फ आप्पा बबनराव मांढरे हे त्यांचे मित्रांना भेटण्याकरीता गोलबाग सातारा येथे गेले असताना २० ते २५ वयोगटातील तीन इसम तेथे आले व त्यामधील एका इसमाने त्याच्याकडील पिस्तुलातून फिर्यादी यांचेवर बेछुट गोळीबार करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी झाले असून त्याबाबत शाहुपूरी पोलीस पोलीस ठाणे गु.र.नं.३५८ / २०२२ भादविक ३०७, ३४ सह आर्म अॅक्ट ३, २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून गुन्हयातील आरोपींना निष्पन्न करुन सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या सुचना श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिल्या. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अरुण देवकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी श्री. रमेश गर्जे, सहायक पोलीस निरीक्षक व श्री. अमित पाटील, पोलीस उपनिरीक्षक यांचे अधिपत्याखाली तपास पथक तयार करुन त्यांना गुन्हयातील आरोपींचा शोध घेवून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले.
सर्व प्रथम तपास पथकाने गुन्हयाचे घटनास्थळाची पाहणी केली, घटनास्थळाचे आजूबाजूचे परिसरातील साक्षीदार यांचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने विचारपूस केली तसेच घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. सी.सी.टी.व्ही फुटेजवरुन नमुद गुन्हयातील तीनही आरोपीची ओळख तपास पथकाने पटवली. सदरचे आरोपी सातारा शहरातील असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांचा सातारा शहरात शोध घेतला असता आज दिनांक १०/११/२०२२ रोजी सदरचे आरोपी खंडोबाचा माळ परीसरात लपुन बसल्याची माहिती तपास पथकास मिळाली. त्याप्रमाणे तपास पथकाने तात्काळ नमुद आरोपींना खंडोबाचा माळ परिसरात छापा टाकुन ताब्यात घेतले. नमुद आरोपींचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने विचारपूस केली असता त्यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादी यांचेवर जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला असल्याचे सांगीतले आहे. नमुद आरोपींना पुढील तपासकामी शाहुपूरी पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले असून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा संवेदनशील स्वरुपाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने ५ तासाचे आत उघडकीस आणला आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद वेबले, प्रविण फडतरे, निलेश काटकर, गणेश कापरे, अजित कर्णे, रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, सचिन ससाणे, स्वप्नील दौंड, शिवाजी गुरव, गणेश कचरे, संभाजी साळुंखे, सायबर विभागाचे निखील जाधव यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
आरोपींची नावे
प्रणव शैलेश पाटोळे वय 19 वर्षे रा खंडोबाचा माळ सातारा
व त्याचे दोन साथीदार जे अल्पवयीन आहेत
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Thu 10th Nov 2022 12:14 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Thu 10th Nov 2022 12:14 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Thu 10th Nov 2022 12:14 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Thu 10th Nov 2022 12:14 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Thu 10th Nov 2022 12:14 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Thu 10th Nov 2022 12:14 pm
संबंधित बातम्या
-
वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.
- Thu 10th Nov 2022 12:14 pm
-
गुरु द्रोणा अकॅडमी फलटण येथे विद्यार्थ्यास मारहाण.
- Thu 10th Nov 2022 12:14 pm
-
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Thu 10th Nov 2022 12:14 pm
-
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Thu 10th Nov 2022 12:14 pm
-
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Thu 10th Nov 2022 12:14 pm
-
वरकुटे-मलवडीत जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांचा छापा; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- Thu 10th Nov 2022 12:14 pm
-
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Thu 10th Nov 2022 12:14 pm
-
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Thu 10th Nov 2022 12:14 pm