साताऱ्यातील शेंद्रेजवळील सोनगाव तर्फमध्ये 95 लाखांची रोकड जप्त
Satara News Team
- Tue 5th Nov 2024 02:16 pm
- बातमी शेयर करा

सातारा ; सध्या विधानसभा निवडणुकीचे धुमशान सुरू निवडणूक काळात अवैधरित्या रोख रकमेची वाहतूक व देवाण-घेवाण होवू नये, यासाठी भरारी पथके तैनात केली आहेत. तपासणी नाक्यावर वाहनांची कडक तपासणी केली जात आहे.
दरम्यान, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील शेंद्रे हद्दीत सोनगाव तर्फ येथे पोलिस विभाग आणि भरारी पथकाच्यावतीने नुकतीच संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ९५ लाखांची रोकड जप्त केली असून ही रोकड एका व्यापाऱ्याची असल्याचे प्रथमदर्शनी समजत असून प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, मंगळवारी शेंद्रेजवळील सोनगाव तर्फ येथे एमएच ४८ सीटी ५२३९ या चार चाकी वाहनाची पथकाने तपासणी केली. यावेळी ९५ लाख रुपयांची रोकड आढळून आली. पथकाने रक्कम जप्त केली असून ती एका व्यापाऱ्याची आहे. याबाबतचा अधिक चौकशी करण्यात येत आहे.
प्रांताधिकारी सुधाकर भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नागेश गायकवाड, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अणि पोलिस यांच्या भरारी पथकाने संयुक्तरित्या कारवाई केली.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Tue 5th Nov 2024 02:16 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Tue 5th Nov 2024 02:16 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Tue 5th Nov 2024 02:16 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Tue 5th Nov 2024 02:16 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Tue 5th Nov 2024 02:16 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Tue 5th Nov 2024 02:16 pm
संबंधित बातम्या
-
वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.
- Tue 5th Nov 2024 02:16 pm
-
गुरु द्रोणा अकॅडमी फलटण येथे विद्यार्थ्यास मारहाण.
- Tue 5th Nov 2024 02:16 pm
-
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Tue 5th Nov 2024 02:16 pm
-
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Tue 5th Nov 2024 02:16 pm
-
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Tue 5th Nov 2024 02:16 pm
-
वरकुटे-मलवडीत जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांचा छापा; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- Tue 5th Nov 2024 02:16 pm
-
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Tue 5th Nov 2024 02:16 pm
-
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Tue 5th Nov 2024 02:16 pm