साताऱ्यात पुन्हा एकदा जादूटोणा ? झेडपीतील तीन विभाग बडीशेपमुळे धास्तावले
टेबलावर रोज बडीशेपचे ढीग; जादूटोण्याची चर्चाSatara News Team
- Fri 17th May 2024 03:04 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्हा परिषद गेल्या तीन दिवसांपासून बडिशेपमुळे धास्तावलेली आहे. जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा,
ग्रामीण विकास यंत्रणा व टाऊन प्लॅनिंग या विभागासमोरील टेबलावर रोज बडिशेपचे ढीग लागल्याचे दिसत आहे. दररोज कर्मचारी साफसफाई करुनही दुसऱ्या दिवशी बडिशेप दिसतच आहे. हा प्रकार अंधश्रध्दा व जादुटोण्याचा तर नाही ना? अशी चर्चा परिसरात सुरु झाली आहे. दरम्यान प्रशासन मात्र या प्रकाराबद्दल अनभिज्ञ असल्याचेच दिसत आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य ईमारतीच्या मागील बाजूला असणाऱ्या दुसऱ्या इमारतीत अनेक विभाग आहेत. गेल्या तीन दिवसांपासून अंधश्रध्दा, करणी करण्याचे प्रकार या इमारतीत सुरु असल्याची चर्चा आहे.
झेडपीत स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग तळपजल्यावर आहे, दुसऱ्या मजल्यावर ग्रामविकास यंत्रणा व लगतच टीपी विभाग आहे. या ठिकाणी तीन दिवसांपासून बडिशेपचे गौंडबंगाल सुरु आहे. या विभागांच्या बाहेरील टेबलावर बडीशेपचे ढीग लागल्याचे दिसून येत आहे. दररोज साफसफाई करुनही ही बडीशेप दुसऱ्या दिवशी टेबलावर दिसतच आहे. या प्रकारामुळे संबंधित विभागातील कर्मचार्यांमध्ये अंध्श्रध्देपोटी हा प्रकार करत असल्याची चर्चा आहे.
प्रशासनाची डोळेझाकजिल्हा परिषद कार्यालय व परिसरात अंधश्रध्देचा प्रकार सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, हा प्रकार जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीरपणे घेतल्याचे दिसून येत नाही. याबाबत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्याचे कष्ट प्रशासनाने घेतले नाही. त्यामुळे या प्रकाराबाबत प्रशासनाला गांभीर्य दिसत नाही.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 17th May 2024 03:04 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 17th May 2024 03:04 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 17th May 2024 03:04 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 17th May 2024 03:04 pm
संबंधित बातम्या
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Fri 17th May 2024 03:04 pm
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Fri 17th May 2024 03:04 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 17th May 2024 03:04 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Fri 17th May 2024 03:04 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Fri 17th May 2024 03:04 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Fri 17th May 2024 03:04 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Fri 17th May 2024 03:04 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Fri 17th May 2024 03:04 pm












