जिल्ह्यातील सात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
Satara News Team
- Mon 5th Aug 2024 07:57 am
- बातमी शेयर करा

सातारा : सातारा जिल्हा पोलिस दलातील सात अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या असून त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.
लोणंद पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी भोसले यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक धोंडिराम वाळवेकर यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश कड यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे यांची सांगली येथे तर अमोल माने यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली झाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, प्रशांत बधे यांचीही सोलापूर ग्रामीण येथे बदली झाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमीत बाबर यांना एक वर्ष मुदतवा देण्यात आली.
या अधिकाऱ्यांच्या जागी सोलापूर ग्रामीण येथून सपोनि प्रशांत हुले, सपोनि आदिनाथ खरात, सपोनि निलेश तारु, सपोनि शंकरराव ओलेकर, सपोनि प्रकाश भुजबळ, सपोनि शिवाजी जायपत्रे तर सांगली येथील सपोनि जयश्री वाघमोडे, सपोनि प्रियांका बाबर यांची सातारा येथे बदली झाली आहे.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Mon 5th Aug 2024 07:57 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Mon 5th Aug 2024 07:57 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Mon 5th Aug 2024 07:57 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Mon 5th Aug 2024 07:57 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Mon 5th Aug 2024 07:57 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Mon 5th Aug 2024 07:57 am
संबंधित बातम्या
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Mon 5th Aug 2024 07:57 am
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Mon 5th Aug 2024 07:57 am
-
जिल्हा परिषद नगररचना विभागात रंगली सामूहिक बिर्याणीची पार्टी.
- Mon 5th Aug 2024 07:57 am
-
अजंठा चौकात टपरी चालकाचे नगरपालिकेला आव्हान
- Mon 5th Aug 2024 07:57 am
-
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील ०३ खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघातुन निवड
- Mon 5th Aug 2024 07:57 am
-
औंध ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सिजन वर असलेल्या व्यवस्थेने घेतला नवजातचा बळी?
- Mon 5th Aug 2024 07:57 am
-
पुसेसावळी येथे पतसंस्थेच्या नावाखाली खाजगी सावकारीचा धंदा सुरू
- Mon 5th Aug 2024 07:57 am