चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार...नात्याला काळिमा फासणारी घटना

सातारा : बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना सातारा शहराजवळील एका उपनगरात घडली आहे. चुलत भावाने सातवीत शिकणाऱ्या लहान बहिणीवर वारंवार अत्याचार केला असून, त्यातून बहीण गरोदर राहिली.


 हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी तातडीने २५ वर्षीय भावाला अटक केली. पीडित मुलगी १३ वर्षाची आहे तिने सातवीतून नुकताच आठवी इयत्तेत प्रवेश घेतला आहे. 


मागील काही महिन्यांपासून तिचा चुलत भाऊ तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. हा प्रकार सांगितलास तर भाऊ, आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे पीडित मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. 

काही दिवसापासून  तिच्या पोटात वेदना होऊ लागल्यानंतर तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी ती गरोदर असल्याचे समोर आले. घरातल्यांनी तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिने चुलत भावाने अत्याचार केल्याचे सांगितले. यानंतर हा सगळा प्रकार पोलिसांकडे गेला. पोलिसांनी पोक्सोचा गुन्हा दाखल करून संबंधित २५ वर्षीय भावाला अटक केली आहे. 

पीडित मुलगी अवघ्या १३ वर्षांची आहे. तिला तातडीने गर्भपाताची परवानगी द्यावी, अशी मागणी पोलिस व नातेवाइकांकडून न्यायालयाकडे करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने पीडित मुलीला गर्भपाताची परवानगी दिली असून, ही प्रक्रिया सुरू झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला