भाजपच्या पहिल्या यादीत साताऱ्यातून शिवेंद्रराजे, माणमधून जयकुमार गोरे तर कराड दक्षिणमधून डॉ. अतुल भोसलेंना उमेदवारी
Satara News Team
- Sun 20th Oct 2024 04:50 pm
- बातमी शेयर करा
सातारा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आज भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. भाजपच्या या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून या कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे
. तर साताराजिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले, माणमधून जयकुमार गोरे आणि कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे
. सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी महत्वाचा मानला जाणाऱ्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांनी भाजपची मोठी ताकद वाढवली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांना मताधिक्य देत विजयी करण्यात महत्त्वाचा हातभार लावला होता. तसेच लोकसभा प्रभारी म्हणूनही डॉ. अतुल भोसले यांनी चांगले काम केले. याही वेळेस २०२४ च्या निवडणुकीत डॉ. अतुल भोसले हे सर्व ताकदीनिशी उतरले आहेत. त्यांना पहिल्याच यादीत भाजपाने संधी दिली दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
भाजपाच्या पहिल्या यादीत 99 पैकी 13 महिला उमेदवार आहेत. अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली असून 99 पैकी 6 एसटी आणि 4 एससी उमेदवार आहेत. पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीष महाजन, आशिष शेलार, नितेश राणे यांचा समावेश आहे. बेलापूरमधून पुन्हा एकदा मंदा म्हात्रे यांनाच भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक यांना तिकीट मिळणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते यांच्या जागेवर प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 20th Oct 2024 04:50 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 20th Oct 2024 04:50 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 20th Oct 2024 04:50 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 20th Oct 2024 04:50 pm
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 20th Oct 2024 04:50 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Sun 20th Oct 2024 04:50 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Sun 20th Oct 2024 04:50 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Sun 20th Oct 2024 04:50 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Sun 20th Oct 2024 04:50 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Sun 20th Oct 2024 04:50 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sun 20th Oct 2024 04:50 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sun 20th Oct 2024 04:50 pm












