सोशल मीडियावर झालेल्या ओळखीनंतर एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर साताऱ्यातील कॅफे, तसेच लॉजमध्ये अत्याचार
प्रकाश शिंदे - Thu 20th Apr 2023 10:13 am
- बातमी शेयर करा
सातारा ; सोशल मीडियावर झालेल्या ओळखीनंतर फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर साताऱ्यातील कॅफे, तसेच लॉजमध्ये अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी संकेत मेंगणे (वय- 19, रा. मेंगणेवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, हल्ली रा. शिक्रापूर, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात एक अल्पवयीन मुलगी कुटुंबीयांसमवेत राहण्यास आहे. इयत्ता नववीत शिकण्यास असलेल्या मुलीची सोशल मीडियाच्या माध्यमातून संकेतशी ओळख झाली. सोशल मीडियावर दोघे एकमेकांशी सातत्याने संपर्क साधत होते. दोघातील संवाद होत असल्याने संकेत मेंगणे हा वारंवार साताऱ्यात येऊ लागला. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान फोटो आणि व्हिडिओ काढले होते. आपल्याकडील फोटो व व्हिडिअो व्हायरल करण्याची धमकी त्याने त्या अल्पवयीन मुलीला देण्यास सुरुवात केली.
संकेत मेंगणेने त्या मुलीस साताऱ्यातील एका लॉज, तसेच एका कॅफेत नेत अत्याचार केला. पीडित मुलीस मेंगणे वारंवार त्रास देवून लागल्याने तिने या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संजय पतंगे है करीत आहेत
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 20th Apr 2023 10:13 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 20th Apr 2023 10:13 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 20th Apr 2023 10:13 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 20th Apr 2023 10:13 am
संबंधित बातम्या
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Thu 20th Apr 2023 10:13 am
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Thu 20th Apr 2023 10:13 am
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 20th Apr 2023 10:13 am
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Thu 20th Apr 2023 10:13 am
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Thu 20th Apr 2023 10:13 am
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Thu 20th Apr 2023 10:13 am
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Thu 20th Apr 2023 10:13 am
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Thu 20th Apr 2023 10:13 am












