सातार्यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल
प्रकाश शिंदे
- Thu 8th May 2025 05:34 pm
- बातमी शेयर करा

सातारा : सातारा शहरातील अंधार कोठडीतील कॅफे पुन्हा एकदा चर्चेत आले असून, कॅफेमध्ये एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या कॅफेवर छापे टाकले. यामध्ये कॅफे मालकासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील सहा महिन्यांपूर्वी शहरातील कॅफेमध्ये तरुण-तरुणींकडून अश्लील चाळे केले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. यानंतर कॅफेमधील पडदे व अंधार कोठडी हटविण्यात आल्या होत्या. परंतु पुन्हा कॅफे चालकांनी महाविद्यालयीन तरुण-तरुणींना आकर्षित करण्यासाठी कॅफेमध्ये अंधार व पडदे लावले. काही दिवसांपूर्वीच हीच संधी साधून शहरातील एका कॅफेमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर एका १७ वर्षांच्या तरुणाने अत्याचार केला. हा प्रकार मुलीच्या आईला समजल्यानंतर आईने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधित तरुणावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून, सुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर सातारा शहर पोलिसांनी दि. ६ रोजी दुपारी शहरातील राधिका रस्त्यावरील आर. बी. कॅफेवर छापा टाकला. याठिकाणी एक महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी सापडली. या दोघांना अश्लील कृत्य करण्यास प्रेरणा दिल्याचा ठपका ठेवत कॅफे चालक रोहित गजानन सुतार (वय २५, रा. किन्हई, ता. कोरेगाव) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत हवालदार संतोष घाडगे यांनी फिर्याद दिली आहे. तसेच याच परिसरातील ब्लॅक इन कॅफेवरही पोलिसांनी छापा टाकला.
याठिकाणी तरुण, तरुणी आढळून आले. कॅफे चालक सुशांत जितीन धुमाळ (वय २६, रा. सोनके, ता. कोरेगाव) याच्यासह संबंधित तरुण, तरुणीवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बैठक व्यवस्था सीसीटीव्हीपासून दूर..
छापा टाकण्यात आलेल्या कॅफेमध्ये बैठक व्यवस्था सीसीटीव्हीपासून दूर ठेवली होती. अंधार करून जोडप्यांना अश्लील कृत्य करण्यास प्रवृत्त केले जात होते. नोंदणी रजिस्टर न ठेवता कॅफेत येणाऱ्यांना प्रवेश दिला जात होता, असे पोलिसांनी सांगितले.
सातारा न्यूजने आंधा-या कॅफे मध्ये नक्की चाललय काय या आशयाखाली वारंवार आवाज उठवला होता. यादरम्यान काही कॅफेवर कारवाई सुद्धा झाली तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी कॅफे चालकांसाठी कॅफेमध्ये पूर्ण प्रकाश सीसीटीव्ही मध्ये बैठक व्यवस्था अशा काही गाईडलाईन्स बनवल्या होत्या परंतु याला सर्व कॅफे चालकांनी या आदेशाला केराची टोपली दाखवून पुन्हा अल्पवयीन मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात आहे. काही भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांचे हात ओले करून अल्फाइल मुला मुलींचा अशा कॅफेमध्ये नंगा डांस सुरू असतो यावर ठोस कारवाई करणे गरजेचे असून ही कारवाई तात्पुरत्या स्वरूपात केल्यास मोठा प्रकार उघडकीस येणार हे नक्की...
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Thu 8th May 2025 05:34 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Thu 8th May 2025 05:34 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Thu 8th May 2025 05:34 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Thu 8th May 2025 05:34 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Thu 8th May 2025 05:34 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Thu 8th May 2025 05:34 pm
संबंधित बातम्या
-
वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.
- Thu 8th May 2025 05:34 pm
-
गुरु द्रोणा अकॅडमी फलटण येथे विद्यार्थ्यास मारहाण.
- Thu 8th May 2025 05:34 pm
-
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Thu 8th May 2025 05:34 pm
-
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Thu 8th May 2025 05:34 pm
-
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Thu 8th May 2025 05:34 pm
-
वरकुटे-मलवडीत जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांचा छापा; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- Thu 8th May 2025 05:34 pm
-
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Thu 8th May 2025 05:34 pm
-
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Thu 8th May 2025 05:34 pm