पिस्तूल विक्री प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून शेनवडी येथे परशुराम कुरवले यास अटक
म्हसवड न्यायालयाने सुनावली न्यायालयीन कोठडी
एकनाथ वाघमोडे- Sun 18th Sep 2022 09:56 am
- बातमी शेयर करा
दहिवडी : सांगली जिल्ह्यातील तडीपार असलेला अट्टल गुन्हेगार पिस्तूल विक्रीसाठी परशुराम रमेश कुरवले फिरत असल्याची माहिती सातारा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्याला साहित्यासह अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने नामिशक्कल लढवत कोल्हापूर जेल मध्ये कुरवले यांची गुन्हेगारीतुन घट्ट मैत्री झालेल्या मित्राच्या नावाने कुरवले यास फोन करुन एका पार्टीला घोडा पाहिजे तु माण तालुक्यातील शेनवडी येथे ये मी तुझी वाट पहातो म्हणून बोगस मित्राच्या नावाने फोन पोलिसांनीच फोन करुन शेनवडी या ठिकाणी बोलवून तडीपार फरारी असलेल्या व पिस्तूल विक्रीचे गिर्हाईक शोधणार्या परशुराम रमेश कुरवले वय २४, मूळ रा. सोमवार पेठ,कराड सध्या रा. आटपाडी, जि सांगली याला शेनवडी येथे सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून .त्याच्या कडून दोन गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त करुन सदर आरोपीस म्हसवड पोलिसांच्या ताब्यात देवून गुरुवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला
याबाबत मिळालेली माहिती अशी, परशुराम कुरवले सातारा,सांगली जिल्ह्यात पोलीस दप्तरी अट्टल गुन्हेगार म्हणून नोंद असलेला गुन्हेगार हा अनेक गुन्ह्या मध्ये सांगली सातारा यांना हवा होता तो गावटी पिस्तूल विक्रीचा व्यावसाय करत असल्याची माहिती सातारा गुन्हेे अन्वेषण विभागाला मिळाली होती आरोपी हुशार व चतुर असल्याने हाती लागत नव्हता आटपाडी पोलीस ठाण्यात काही काळ काम केलेले व सध्या सातारा गुन्हे अन्वेषण विभागाचा पदभार असलेले अरुण देवकर यांनी कुरवले यास पकडण्यासाठी नामिशक्कल लढवली कोल्हापूरच्या कळबा जेल मध्ये दिड वर्षापूर्वी कुरवले होता तेथे गुन्हेगारीतुन मैत्री झालेल्या कुरवले यांच्या जोडीदाराच्या नावाने कुरवले यास फोन करून पिस्तूल विक्रीची पार्टी आहे मी त्या पार्टीला घेऊन माण तालुक्यातील शेनवडी येथे येतो तु शेनवडीला ये तुझी वाट पहातो म्हणून पोलिसांनीच गुरुवारी मध्यरात्री मित्र म्हणून फोन केला शुक्रवारी पोलिसांनी सापळा लावला होता काल गुरुवार दि. १६ रोजी शेनवडी फाटा परिसरात पिस्टल विक्रीसाठी फोन केलेल्या मित्राला शेनवडी शोधत फिरत असताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर व पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांचे व सहकाऱ्यांनी शेनवडी फाटा परिसरात सापळा लावून सदर वर्णनाचा एक युवक त्याठिकाणी फिरताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतला. त्याची व गाडीची झडती घेतली असता.पोलिसांना दोन गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली.पोलिसांनी त्याला पिस्टलबाबत विचारणा केली असता विक्रीसाठी आणल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडून दोन पिस्टल, काडतुसे व एक दुचाकी असा एक लाख ७० हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याला पुढील कारवाईसाठी म्हसवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, अतिश घाडगे, संतोष पवार, संतोष सपकाळ,शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, विशाल पवार, मोहन पवार,पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, मयूर देशमुख, स्वप्नील दौंड, धीरज महाडिक, मोहसीन मोमीण, शिवाजी गुरव यांनी करून म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि राजकुमार भुजबळ यांच्या ताब्यात देवून परशुराम रमेश कुरवले याचेवर पिस्तूल विक्रीच गुन्हा दाखल करण्यात येवून आज शनिवारी दुपारी
परशुराम रमेश कुरवले यांस म्हसवड न्यायालयात हजर केले आसता कुरवले यांस न्यायालयीन कस्टडी सातारा जेल मध्ये रवानगी करण्यात आली असल्याची माहिती सपोनि राजकुमार भुजबळ यांनी दिली

म्हसवड पोलीस ठाण्यात पिस्तूल विक्रीतील आरोपी परशुराम कुरवले समवेत सपोनि भुजबळ, पीएसआय विशाल भंडारे व पोलिस कर्मचारी...
(छाया : एकनाथ वाघमोडे)
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 18th Sep 2022 09:56 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 18th Sep 2022 09:56 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 18th Sep 2022 09:56 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 18th Sep 2022 09:56 am
संबंधित बातम्या
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Sun 18th Sep 2022 09:56 am
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Sun 18th Sep 2022 09:56 am
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 18th Sep 2022 09:56 am
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Sun 18th Sep 2022 09:56 am
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Sun 18th Sep 2022 09:56 am
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Sun 18th Sep 2022 09:56 am
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Sun 18th Sep 2022 09:56 am
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Sun 18th Sep 2022 09:56 am












