साताऱ्यातील चाफळच्या ऐतिहासिक श्रीराम मंदिरातील घंटेची चोरी, एकजण ताब्यात

कऱ्हाड : चाफळ (ता. पाटण) येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरातील सुमारे दहा किलो वजनाची पूर्वापार वापरात असलेली पितळी गोलाकार घंटा चोरीला गेली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्हीच्या आधारे एकाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. योगेश जयवंत शिंगाडे (रा. खोडद-अतीत, ता. सातारा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांचे नाव आहे.

चाफळ येथील मंदिरात सुमारे दहा किलो वजनाची पितळी घंटा होती. ही घंटा दर तासांनी वेळेची सूचना देत होती. या घंटेचा आवाज परिसरातील गावात निनादतो. मात्र, रविवारी रात्री ही घंटा चोरीला गेली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी भेट दिली. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे या चोरीबाबत कसून चौकशी केली जात आहे. राम मंदिरात सुरक्षारक्षक असूनही चोरट्याने घंटा चोरून नेल्याने गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला