सातारा शहरात मिरवणुकीत चेंगराचेंगरी; तरुण पायाखाली चिरडला, सुदैवाने पोलिसांमुळे जीव वाचला
सकलेन मुलाणी- Fri 29th Sep 2023 03:29 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात गणपती विसर्जन मिरवणूक पार पडली. सातारा शहरात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत चेंगचेंगरी होऊन एक तरुण जखमी झाला.
चेंगराचेंगरीत पायाखाली चिरडल्याने गुदमरून तो बेशुद्ध पडला. यावेळी प्रसंगावधान दाखवत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला गर्दीतून सुरक्षित बाहेर काढल्याने जीव वाचला.
मोती चौक परिसरातील घटना
दुसरीकडे, साताऱ्यातत विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. काल (ता. 28 सप्टेंबर) गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास राजपथावरील मोती चौक परिसरात मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमध्ये अनेकांची दमछाक झाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीने गर्दीतील एक तरुण गुदमरून बेशुद्ध झाला. ही घटना निदर्शनास येताच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गर्दी बाजूला करून तरुणाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तरुणाचे प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळला.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 29th Sep 2023 03:29 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 29th Sep 2023 03:29 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 29th Sep 2023 03:29 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 29th Sep 2023 03:29 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 29th Sep 2023 03:29 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 29th Sep 2023 03:29 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Fri 29th Sep 2023 03:29 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Fri 29th Sep 2023 03:29 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Fri 29th Sep 2023 03:29 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Fri 29th Sep 2023 03:29 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Fri 29th Sep 2023 03:29 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Fri 29th Sep 2023 03:29 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Fri 29th Sep 2023 03:29 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Fri 29th Sep 2023 03:29 pm













