भरदिवसा गळा चिरला :शिवथरमध्ये महिलेचा निर्घृण खून

वडूथ : शिवथर ता. सातारा येथे सोमवार दिनांक ७ रोजी दुपारच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने एका महिलेच्या गळा चिरून निघृन खून करण्यात आला . खून झालेल्या महिलेचे नाव पूजा प्रथमेश जाधव वय 25 असे आहे. खुनाचे कारण समजू शकले नाही.घटनास्थळी सातारा तालुका पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई चालू आहे. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा पंचनामा करण्याचे काम चालू होते. मयत महिला शिवविच्छेदनासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे.


 घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पूजा जाधव हिचे घर शिवथर गावापासून शिवथर - मालगाव रोडवर एक किलोमीटर अंतरावर आहे. घरामध्ये सासू-आनंदीबाई सासरे निवृत्ती जाधव,पती प्रथमेश जाधव व मुलगा यश जाधव तर प्रथमेश चा दुसरा भाऊ सागर जाधव हा कामानिमित्त कुटुंबासमवेत पुणे येथे कामानिमित्त राहत असतो. पूजा आणि प्रथमेश यांचे लग्न 2017 साली झाले असून तिची माहेर शिवथर आहे त्यांना सात वर्षाचा एक मुलगा आहे असा एकूण परिवार आहे. सोमवार दिनांक सात रोजी घरातील सासू-सासरे हे कामानिमित्त शेतामध्ये गेले होते. पती प्रथमेश जाधव हा सातारा येथील आनंद ट्रेडर्स मध्ये सकाळी साडेनऊलाच मुलाला शाळेत सोडून कामाला गेलेला होता. मुलगा यश जाधव वय सात हा इयत्ता दुसरी मध्ये शिकत असून तोही शाळेतच गेला होता. राहत्या घरामध्ये पूजा जाधव ही एकटीच होती. दुपारच्या दरम्यान घरातील सर्व दरवाजे उघडे असल्यामुळे शेजारी राहत असणारी आजी घरामध्ये गेल्यानंतर हा सर्व प्रकार समजला. त्यानंतर शेजाऱ्यांनी शेतामध्ये कामाला गेलेल्या सासू-सासऱ्यांना बोलावून घेतले. घरामध्ये सुनेचा झालेला खून पाहून सासू-सासरे हतबल झाले. शेजारीच राहणाऱ्या घरातल्यांनी प्रथमेश जाधव याला कामावर गेलेला असल्यामुळे बोलून घेतले. घडलेल्या घटनेची माहिती शिवथर व परिसरात समजल्यानंतर ग्रामस्थांचे गर्दी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर झाली होती.


माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव पंचनामा करुन ठसे तज्ञ, श्वान पथकाला पाचारण केले. यानंतर सायंकाळी उशीरा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हीलमध्ये नेला. प्राथमिक माहितीनुसार धारदार शस्त्राने गळ्यावर वार झाल्याने पूजा यांचा मृत्यू झाला आहे. रात्री उशीरापर्यंत शवविच्छेदन सुरु होते. तोपर्यंत पोलिसांनी माहिती घेवून तपासाला सुरुवात केली. तांत्रिक तपासासह परिसरातील ग्रामस्थांकडून माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु केली. पोलिसांची तीन पथके तपासासाठी तैनात करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला